Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ujani-Solapur Pipeline : ‘उजनी-सोलापूर पाईपलाईनसाठी 350 कोटी; अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

Ajit Pawar Announcement : आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. एकदा शब्द दिला की कुणाच्या बापाला ऐकत नाही.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर जिल्ह्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिळाले. मात्र, आजही माझ्या सोलापूरला रोज पाणी मिळत नाही. शहरात 6 दिवसाआड पाणी येतं. आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. एकदा शब्द दिला की कुणाच्या बापाला ऐकत नाही. उजनी ते सोलापूर शहर पाईपलाईनसाठी 350 कोटींचा निधी देणार असून नॅशनल हायवेच्या हद्दीतून ही पाईपलाईन आणणार आहोत. कुणी अडथळा केल्यास गुन्हा दाखल करा, असा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. (350 crore fund for Ujani-Solapur pipeline: Ajit Pawar's announcement)

कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी आज (ता. ३ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्यासोबतच काही माजी नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला. मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांचा त्यात समावेश होता. (Ujani-Solapur Pipeline )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर जिल्ह्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केला. मात्र, आजही माझ्या सोलापूरला रोज पाणी मिळत नाही. शहराला 6 दिवसाआड पाणी येतं. आम्ही दिलेला शब्द पाळणारे माणसं आहोत. एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाला ऐकत नाही. उजनी ते सोलापूर शहर जलवाहिनीचा प्रश्न सुटावा, यासाठी 350 कोटींचा निधी देणार आहे. एक तर मी शब्द देत नाही. शब्द देण्याअगोदर मी 10 वेळा विचार करतो. राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतून आम्ही उजनी ते सोलापूर पाईपलाईन आणत आहोत. कोणी अडथळा आणला, तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कारवाई करा, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमय करून दाखवू. महापालिकेची इमारत बघायला गेलो होतो. जुनी गोष्ट व्यवस्थित टिकवायची असते, ती त्यांनी जतन केली आहे. घरात भांड्याला भांड लागतं. पण, त्याचा आवाज येऊ द्यायचा नसतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहावे. तुमचं घर मजबूत असेल, तर आजूबाजूच्या राजकीय पक्षांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे.

माजी आमदार रविकांत पाटील यांची मदत घेऊन सोलापुरात वाटचाल करायची आहे. राष्ट्रवादीत तरुण रक्ताला वाव मिळेल. लक्षात ठेवा आपल्याला लेटरपॅड मिळाले असेल तर डोक्यातून काढा. पदं मिरवायला आणि लग्नपत्रिकेत छापायला नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला काम करावं लागेल. मी सकाळपासून काम करतो, माझं एकट्याच काम पूर पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बदल घडवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, तसा निर्णय आपण घेतला. आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मजबूत तयार करायचा आहे. लोकांची कामे करण्यासाठीच आपण सत्तेत गेलो आहोत. आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत. त्यात फक्त वेळ जातोय. मी सत्तेत आहे; म्हणून सोलापूरसाठी निधी जाहीर करतोय. पण, एकमेकांना ढुसणं देत बसू नका. माझं ऐकलं नाही तर माझ्याशी गाठ आहे, अशा शब्दांत दादांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

अजित पवार म्हणाले, काम करताना तुम्ही कलेक्टरकडे जा. माझ्या कार्यकर्त्याने काम आणलं आहे, असं मी त्यांना सांगेल. पण, तिथं एक नंबरचीच कामे घेऊन जा. कसलीही दोन नंबरची कामे घेऊन जाऊ नका. मुंबईत सारखं सारखं यायचं नाही. कामे घेऊन या. मागणी करेपर्यंत मी तुमचं ऐकेन. मात्र, निर्णय झाला की माझ्या कार्यकर्त्याने त्याचं समर्थन केल पाहिजे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये स्पार्क असेल तर अशा युवकांनाही आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करा.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT