Solapur New Voters : सोलापूर जिल्ह्यात वाढले 1 लाख नवे मतदार; पुरुषांच्या तुलनेत महिला 4386 ने वाढल्या

Election News : नवमतदारांच्या वाढीत सोलापूर जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.
kumar Ashirwad
kumar AshirwadSarkarnama

Solapur News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणीनंतर जिल्ह्यात 1 लाख 02 हजार 850 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 35 लाख 78 हजार 972 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे सोलापुरात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 4 हजार 386 ने वाढली आहे. नवमतदारांच्या वाढीत सोलापूर जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. (1 lakh new voters increased in Solapur district)

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार यादी अद्ययावत करणासाठी पुनर्रिक्षण, तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

kumar Ashirwad
Solapur News : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल; चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

या मोहिमेत जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटात 28 हजार 850 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच, 20 ते 29 या वयोगटात 35 हजार 210 मतदारांची वाढ झाली आहे. या नोंदणीत सोलापूरने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत ३६ लाख ३३ हजार ०७२ एवढे मतदार सोलापूर जिल्ह्यात होते. मात्र, त्यात 72 हजार 806 मयत मतदार होते. ही सर्व नावे वगळ्यात आली आहेत. तसेच एकसारखे फोटो असणारे 60 हजार 967 मतदार होते, त्याची पडताळणी करून तील 15 हजार 363 मतदारांच्या नावे वगळण्यात आली. दोन वेगवेगळ्या मतदारसंघात एकसारखी असणारी अशी 3 हजार165 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण १ लाख ५६ हजार ९५० नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

kumar Ashirwad
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी, गिरणी कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली अन् मंत्रीही केलं...

गेल्या वर्षीच्या प्रारूप यादीतून १ लाख ५६ हजार ९५० मतदार वगळल्यानंतर आणि नवी मतदारसंघ त्या समाविष्ट केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची एकूस संख्या 35 लाख 78 हजार 972 वर जात आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात 49 हजार 220 पुरुष मतदार, 53 हजार 606 स्त्री मतदार आणि 24 तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे. पुरुष आणि महिला गुणोत्तरही 923 वरून 931 इतके वाढले आहे.

नव्या मतदारांची नोंदणी ऑनलाईन फार्म क्रमांक ६ भरून करता येईल. तसेच, फॉर्म क्रमांक 8 भरून मतदार यादीत दुरुस्तीही करता येणार आहे. फॉर्म क्रमांक 7 द्वारे मतदार यादीतून नाव कमी करता येणार आहे. प्रत्येक मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

kumar Ashirwad
Balasaheb Thackeray Birth Anniversary : ‘ती’ निवडणूक जिंकताच बाळासाहेबांनी कौतुक केले अन्‌ माँसाहेबांनी जेवायला तीन हजार दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com