Ajit Pawar Visit Sangli : शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता अजित पवार सांगलीत येणार ; शक्तिप्रदर्शन न करण्याचा सूचना....

NCP Vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे. अजित पवार गट सांगली जिल्ह्यातही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sangli : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सांगली दौऱ्यावर आले होते. शरद पवारांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार 5 फेब्रुवारीला सांगली जिल्ह्याचा दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विटा आणि जत येथे शेतकरी मेळावे, पक्षप्रवेश अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पण शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे अकाली निधन झाल्याने अजित पवार गटाचा मेळावा आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात अजित पवार बाबर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन करणार आहेत. (Ajit Pawar Vist Sangli )

Sharad Pawar, Ajit Pawar
Raj Thackeray On Maratha Reservation : 'मागण्या मान्य झाल्या मग उपोषण कसलं करताय...' राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना डिवचले

अजित पवार (Ajit Pawar) विटा येथे जाऊन बाबर कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत. तसेच काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या घरीही भेट देणार आहेत. आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्या निधनाने कोणतेही शक्तीप्रदर्शन करू नये, अशा सूचना खुद्द अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे.आमदार बाबर यांच्या निधनामुळे पक्षप्रवेश, पक्षाची बैठक व मेळावा रद्द केले आहेत. मात्र काही दिवसातच पुन्हा अजित पवार जिल्हा दौर्‍यावर येणार असून त्यावेळी पक्षाचा मेळावा व पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे. अजित पवार गट सांगली जिल्ह्यातही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे. या परिस्थितीत पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांना जयंत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सांगलीत येणार असल्याने शेतकरी मेळाव्याचे, पक्ष प्रवेशाचेही नियोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडून तालुका दौरे सुरू करण्यात आले. विटा येथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये काही राजकीय प्रवेश होणार होते. या शिवाय जतमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण, खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचे 31 जानेवारी रोजी अकाली निधन झाले. बाबर हे सहयोगी पक्षाचे आमदार असल्याने जिल्ह्यात कार्यक्रम घेणे उचित नाही. त्यामुळे कोणतेही भरगच्च कार्यक्रम घेऊ नयेत, अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(Edited By Roshan More)

Sharad Pawar, Ajit Pawar
Budget 2024 : "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न, पण...", निंबाळकरांची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com