grampanchayat elections
grampanchayat elections Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पारनेर नगरपंचायतीसाठी 89 अर्ज दाखल : विजय औटींच्या पत्नी निवडणूक रिंगणात

मार्तंड बुचुडे

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात 13 जागांसाठी आजपर्यंत 89 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात काँग्रेसकडून ( Congress ) कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पारनेरची निवडणूक ही शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP )भाजप ( BJP ) यांच्यात होणार आहे. शिवसेनेकडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 89 applications filed for Parner Nagar Panchayat: Vijay Auti's wife in the election arena

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (ता. सात) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जागांसाठी अर्ज दाखल झाले. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने 2, शिवसेनेने 16 व भारतीय जनता पक्ष व शहरविकास आघाडी यांनी सर्व जागांसाठी 12 अर्ज दाखल केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागासवर्गाच्या चार प्रभागांत निवडणूक स्थगित झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच चार प्रभागांतील उमेदवारी अर्ज मात्र आज स्वीकारले नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या १७ जागांपैकी फक्त 13 जागांसाठीच निवडणूक होत आहे.

आज अर्ज दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारांत शिवसेनेतर्फे माजी सभापती व माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांच्यासह स्वाती खोडदे, रोहिणी औटी, प्रांजल कोकाटे, रेणुका रुईकर, युवराज पठारे व अनिता मोढवे यांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वैशाली औटी, विजेता सोबले, विद्या कारवरे, हिमानी नगरे, उषा खोसे, अंजूम शेख यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

शिवसेनेतर्फे वरच्या वेशीतून भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन जयश्री औटी, अनिकेत औटी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके यांच्या उपस्थितीत रॅलीने नगरपंचायत कार्यालयात येऊन अर्ज दाखल करण्यात आले.

आमदार नीलेश लंके, बाबाजी तरटे, ॲड. राहुल झावरे, संदीप चौधरी, सचिन पठारे, विजय डोळ यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत आमदार कार्यालयापासून रॅलीने येऊन लाला चौकात असलेल्या नूरशहा बाबा दर्ग्यावर विधिवत चादर चढवून नंतर हनुमान मंदिरात दर्शन घेऊन अर्ज दाखल केले. प्रभाग पाचमध्ये नितीन अडसूळ यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे तेथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी या प्रभागात अर्ज दाखल केला नाही.

एकूण दाखल अर्ज- 89

स्थगित झालेल्या प्रभागात दाखल अर्ज - 13

एकूण नगरपंचायतीसाठीच्या जागा - 17

निवडणूक प्रस्तावित जागा - 13

निवडणूक स्थगित जागा - 4

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT