Solapur, 18 June : तब्बल १० वर्षांनंतर झालेल्या सोलापूर विधान परिषदेसाठी आज (ता. १८ जून) ९९. ६८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सहापैकी पाच केंद्रावर १०० टक्के मतदान झाले आहे, फक्त सोलापूर शहरातील उत्तर सोलापूर केंद्रावर ९८.९४ टक्के मतदान झाले आहे. एकूण ६१६ पैकी फक्त दोघांचे मतदान होऊ शकले नाही, बाकी ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात लढत झाली. उमेदवार जरी राऊत आणि देशमुख असले तरी खरी लढत ही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात झाल्याचे मानले जात आहे.
गोरे आणि मोहिते पाटील यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण भाजप आणि महायुतीकडे बहुमताचा आकड मोठा असल्याने या ठिकाणी राऊत हे निवडून येणे निश्चित मानले जात आहे. पण मोहिते पाटील यांनी रंगत आणली होती.
विधान परिषदेसाठी सहा मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यात कुर्डूवाडी केंद्रावर एकूण ८० मतदार होते, त्या ठिकाणी १०० टक्के मतदान झाले आहे. उत्तर सोलापूर केंद्रावर १८८ मतदार होते, त्यापैकी १८६ मतदान झाले आहे. या ठिकाणी दोन मतदान कमी झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दत्तात्रेय नडगिरी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे त्यांचे मतदान झाले नाही. तसेच, रुद्रेश बोरामणी हे भाजपचे स्वीकृत नगरसेवक परदेशात म्हणजे अमेरिकेत असल्याने त्यांचेही मतदान होऊ शकलेले नाही, त्यामुळे ते दोन मतदान होऊ शकले नाही.
दक्षिण सोलापूर केंद्रावर ८९ मतदान होते, त्या ठिकाणीही १०० टक्के मतदान झाले. पंढरपूर केंद्रावर १०० मतदान होते, तिथेही सर्वच सर्व १०० मतदान झाले. मंगळवेढ्यात ६२, तर अकलूजमध्ये ९७ मतदान होते, या केंद्रांवरही शंभर टक्के मतदान झाले आहे.
विधान परिषदेसाठी ९९. ६८ टक्के मतदान झाले असले तरी महायुतीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण भाजप आणि महायुतीकडे मोठे बहुमत आहे, त्यामुळे येत्या २२ जून रोजी राऊत यांचा किती मतांनी विजय होणार, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.