Lokhande On Wakchaure : पराभूत सदाशिव लोखंडेंची तलवार म्यान : म्हणाले, भाऊसाहेब वाक्‌चौरेंचे शिवसेनेत स्वागत करणार!

Shivsena Split News : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाक्‌चौरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
Sadashiv Lokhande-Bhausaheb Wakchaure
Sadashiv Lokhande-Bhausaheb WakchaureSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar, 18 June : शिर्डीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाक्‌चौरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्वागत केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे मी माझी खासदार म्हणून स्वागत करतो, असे सध्याच्या राजकीय घडामोडींवर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.

माजी खासदार लोखंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार भाऊसाहेब वाक्‌चौरे यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला असेल तर मी त्याचे स्वागत करतो. आम्ही २०१४, २०१९ आणि २०२४ अशा आम्ही तीन निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या आहेत. मी २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आलो, तर २०२४ मध्ये वाक्‌चौरे निवडून आले. राजकारणात जय-पराजय होतच असतात. पण, या मतदारसंघातील लोकांनी आम्हाला गेली १५ वर्षे विश्वासाने मतदान केले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या निर्णयाचे मी माजी खासदार म्हणून स्वागत करतो.

शिर्डी मतदारसंघात अडचणींच्या अनेक गोष्टी आहेत. २००९ मध्ये वाक्‌चौरे हे रामदास आठवलेंना हरवून निवडून आले. २०१४ मध्ये माझी (सदाशिव लोखंडे) आणि वाक्‌चौरे अशी लढत झाली, त्यावेळी आठवले माझ्या प्रचाराला आले होते, त्यावेळी मी निवडून आलो. २०१९ मध्ये मी भाऊसाहेब कांबळेंचा पराभव केला, तर २०२४ मध्ये वाक्‌चौरे यांनी माझा पराभव केला, असे लोखंड म्हणाले.

ते म्हणाले, रामदास आठवले आता महायुतीसोबत आहे, त्यानंतर आता भाऊसाहेब वाक्‌चौरे शिवसेनेत येत आहेत, अशी माहिती आहे. काँग्रेस नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हेही शिवसेनेत आले आहेत. म्हणजे चारही पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. शिर्डीत राजकारणाचा चमत्कार पहायला मिळत आहे. आता भाऊसाहेब कांबळे, वाक्‌चौरे आणि सदाशिव लोखंडे शिंदे गटात असतील आणि रामदास आठवले हे महायुतीसोबत आहेत.

आम्हाला जनतेने दोनवेळा लोकसभेला संधी दिली. तिसऱ्या वेळी चार विधानसभा मतदारसंघात लीड मिळाले. पण दोन मतदारसंघात पिछाडीवर राहावे लागल्याने पराभव स्वीकारावा लागला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही सदाशिव लोखंडे म्हणाले.

ते म्हणाले, मला तीन वेळा आमदार, दोन वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे चांगलं काम करण्याचा आणि लोकांच्या सुख दुःखात त्यांच्यासोबत राहण्याचा मी माजी खासदार म्हणून प्रयत्न करणार आहे आणि पक्षासोबत राहणार आहे.

वाक्‌चौरेंना सरकार संरक्षण देणार : लोखंडे

भाऊसाहेब वाक्‌चौरे यांना सरकार संरक्षण देणार आहे. त्यांची ताकद आणि काम हे कशा प्रकारे वापरतात, हे पाहावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पक्षप्रवेशाचे मी स्वागत करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com