

Satara, 18 June : सांगली-सातारा विधान परिषदेसाठी आज (ता. 18 जून) सातारा जिल्ह्यात ७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. सातारा शहरातील तहसील कार्यालय मतदान केंद्रावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे अनपेक्षितपणे एकत्र आले. यावेळी उदयनराजे आणि शिंदे यांची गळाभेट आणि कानगोष्टी झाल्या. त्याची साताऱ्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून उद्योजक अभयसिंह जगताप हे निवडणूक लढवत आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र पाटील हे मतदान केंद्रावर आले होते.
त्यांच्यानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले हे मतदान केंद्रावर एकत्र आले होते. त्या वेळी या सर्वांमध्ये चर्चा झाली. विधान परिषदेसाठी मतदान सुरू असताना त्यांच्यात झालेल्या संवादाची औत्सुक्य आहे.
सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात रंगलेली चर्चा कुतुहालाचा विषय ठरली आहे. शेजारी शिवेंद्रराजे उभे असताना उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांच्या कानात बोलणे पसंत केले, त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता आहे.
या वेळी शशिकांत शिंदे हे मंत्री शिवेंद्रराजेंना उद्देशून म्हणाले, मी उदयनराजे भोसले यांना म्हटलं, भेटायला येतो पाच मिनिट. तेव्हा ते म्हणाले, आपण नंतर भेटू, फोनवर बोलू आपण. शशिकांत शिंदे यांनी टाकलेल्या गुगलीला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, ‘मैत्री ही मैत्री असते.’ त्याला शिंदे यांनीही हो हो म्हणत होकार दर्शविला.
तेवढ्यावर न थांबता उदयनराजे म्हणाले, भेटायला नंतरनं, कधीपण या, मला काय?, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर उदयनराजे हे ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील यांच्याही कानात बोलले, त्यामुळे उदयनराजे हे शिवेंद्रराजेंसमोरच शशिकांत शिंदे आणि ठाकरे सेनेचे नरेंद्र पाटील यांच्या कानात काहीतरी बोलेले, त्यामुळे या त्रिकूटाच्या कानगोष्टीची चर्चा साताऱ्यात चवीने चर्चिली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.