Vishwajeet Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishwajeet Kadam : विश्वजीत कदमांना मिळाली वाढदिवसाची मोठी भेट

Vishwajeet Kadam News : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना ठरला ‘सर्वोत्कृष्ट’

सरकारनामा ब्यूरो

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०२१-२२ या वर्षासाठी दिला जाणारा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कडेगाव तालुक्यातील वांगी (जि. सांगली) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्याला जाहीर झाला आहे. त्यामुळे हा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला असून विश्वजीत कदमांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोठी भेट मिळाली आहे.

रोख दोन लाख ५१ हजार रुपये आणि मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांना पाच पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर दोन शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यापैकी दोन पुरस्कार दौंड तालुक्यातील दौंड शुगर या खासगी कारखान्याला जाहीर झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते २१ जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष व माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी शुक्रवारी (ता. १३) संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शिरपूर येथील श्री पांडुरंग या दोन कारखान्यांना रोख एक लाख रुपयांचा कै.डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

यासह दौंड शुगरला दक्षिण विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन हा अन्य एक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या अन्य कारखान्यांमध्ये जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर, बारामती तालुक्यातील माळेगाव आणि इंदापूर तालुक्यातील निरा-भीमा यांचा समावेश आहे. ‘विघ्नहर’ला उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन आणि ‘माळेगांव’व ‘निरा-भिमा’ला उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार विजेते कारखाने कोणते?

श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार), डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना, वांगी (कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार), जयवंत शुगर्स धावरवाडी, ता. कराड (कै. रावसाहेब पवार उत्कृष्ट आसवनी पुरस्कार), क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल, ता. पलूस (कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार).

विभागनिहाय उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार :

दक्षिण विभाग : उदयगिरी शुगर, बामणी (जि. सांगली) व दौंड शुगर्स, आलेगाव, ता. दौंड (जि. पुणे).

उत्तरपूर्व विभाग : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, ता. अंबड, (जि. जालना).

विभागनिहाय उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार :

दक्षिण विभाग : सह्याद्री सहकारी साखर कारखाना, ता. कराड (जि. सांगली).

मध्य विभाग : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, ता. जुन्नर (जि. पुणे).

उत्तरपूर्व विभाग : विलास सहकारी साखर कारखाना (जि. लातूर).

विभागनिहाय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार कोणाला?

दक्षिण विभाग : प्रथम - कल्लाप्पाआण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना, हातकणंगले, (जिल्हा कोल्हापूर), मध्य विभाग :- प्रथम - निरा -भिमा सहकारी साखर कारखाना, ता. इंदापूर (जिल्हा पुणे), द्वितीय - माळेगाव सहकारी साखर कारखाना, ता. बारामती (जिल्हा पुणे), तृतीय - लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, ता. नेवासा (जिल्हा नगर), उत्तरपूर्व विभाग :- प्रथम - विलास सहकारी साखर कारखाना, ता. उदगीर (जिल्हा लातूर), द्वितीय - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, ता. घनसांगवी, (जिल्हा जालना).

विभागनिहाय उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार :-

दक्षिण विभाग - सह्याद्री कारखाना, या. कराड (जिल्हा सातारा), मध्य विभाग - श्री. विघ्नहर, ता. जुन्नर (जिल्हा पुणे), उत्तरपूर्व विभाग - विलास सहकारी कारखाना (जिल्हा लातूर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT