Solapur Dpc Meeting : खासदार ओमराजे म्हणाले, ‘मला विसरू नका’; विखे-राऊतांच्या ‘त्या’ उत्तराने राजकीय चर्चेला उधाण...

आमदार राऊतांच्या वाक्यातील राजकीय अर्थ लक्षात येताच पालकमंत्री विखे पाटील यांनीही तत्परतेने ‘होय, तुम्हालाही सोबतच घ्यायचंय,’ अशी कोटी केली.
Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : विषय होता पीक विम्याचा. विमा कंपनी शेतकऱ्यांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण मुंबईला जाऊ, असे आश्‍वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज (ता. १३ जानेवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. मुंबईला जाताना मला विसरु नका, असा शेरा शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (OmRaje nimabalkar) यांनी मारला. त्यावर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) ‘तुम्हाला सोबतच घ्यायचंय’ असे राजकीय आशयघन विधान केले. आमदार राऊतांच्या वाक्यातील राजकीय अर्थ लक्षात येताच पालकमंत्री विखे पाटील यांनीही तत्परतेने ‘होय, तुम्हालाही सोबतच घ्यायचंय,’ अशी कोटी केली. (Solapur District Planning Committee Meeting)

Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb Thorat News: बाळासाहेब थोरातांचा भाजपच्या बड्या नेत्याला फोन : ‘सत्यजित तांबेंना उमेदवारी...’

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. शिवसेनेतील या उठावामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर अद्यापही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात येणाऱ्या बार्शी विधानसभा मतदार संघातील पीक विम्याचा प्रश्‍न खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रभावीपणे मांडला.

Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
Kadam Vs Jadhav : गुहागरचा पुढचा आमदार शिंदे गटाचा करण्याची जबाबदारी माझी : रामदास कदमांचे जाधवांना चॅलेंज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून बार्शीचे अपक्ष व भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांची ओळख आहे. राज्यात आणि शिवसेनेत काही जरी झाले तरीही खासदार निंबाळकर आणि आमदार राऊत यांचे नाते आजही मधूरच असल्याचे वारंवार दिसत आहे. त्यांच्या या नात्याची जाणीव झाल्यानेच पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, खासदार निंबाळकर आणि आमदार राऊत कधी भांडत नाहीत. त्यांच्यात फिक्सिंग असल्याचे शेरा त्यांनी मारला.

Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
Kokan News : कोकणात शिवसेनेच्या विरोधात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिंदे गट एकत्र

दोन भावांना वेगवेगळी भरपाई

बार्शी तालुक्यातील उपळाई येथील प्रश्‍न मांडताना खासदार निंबाळकर म्हणाले, एकाच गावात, एकाच घरात असलेल्या व शेजारी शेजारी शेत असलेल्या दोन भावांना विमा कंपन्यांनी वेगवेगळी भरपाई दिली आहे. हा फरक कसा पडतो. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जे पैसे देतात, त्यांना वाढीव मोबदला मिळतो. शेतकरी आम्हाला विचारतात असे करु नका. सर्वांना समान मोबदला द्या. त्यावर उत्तर देण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे उभे राहिले, असा प्रश्‍न जिल्ह्यातील इतरही गावांत असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे (एआयसी) अधिकारी माझा फोन घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी एआयसीच्या मुंबई ऑफीसला जाण्याचे ठरले. जाताना मला घेऊन चला असा प्रस्ताव खासदार निंबाळकर यांनी ठेवला होता. त्यावर तुम्हाला सोबत घेणार असल्याचेच पालकमंत्री विखे-पाटील व आमदार राऊत यांनी सांगितले.

Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
NCP News : राष्ट्रवादीच्या कटकटी संपेनात : लोकसभेतील एकाची खासदारकी जाणार; संख्याबळ घटणार

ओमराजेंच्या प्रश्नाने जिल्हाधिकारी-निवासी उपजिल्हाधिकारी निरुत्तर

सततच्या पावसामुळे २०२१ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात का मिळाले नाहीत? असा प्रश्‍न खासदार निंबाळकर यांनी विचारला. या संदर्भातील पत्र नसल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले. तुम्ही मला पुन्हा तेच उत्तर देऊ नका, सरकारच्या ज्या पत्रावर उस्मानबादच्या शेतकऱ्यांना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी पैसे दिले, ते पत्र सोलापूर जिल्ह्याला चालत नाही का? सोलापूर किंवा उस्मानबाद महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा प्रश्‍न खासदार निंबाळकर यांनी विचारताच जिल्हाधिकारी शंभरकर व निवासी उपजिल्हाधिकारी पवार निरुत्तर झाले. उस्मानबादच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्‍न सोडविण्याची सूचना पालकमंत्री विखे-पाटील यांनी केली.

Om Rajenimbalkar,Rajendra Raut, Radhakrishna Vikhe Patil
Sunil Kedar मोठी बातमी : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

डॉ. गेडाम यांच्या कामाची आठवण

जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी निधी आहे; परंतु कामे होत नाहीत. कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत यांनी केली. उस्मानाबादचे तत्कालिन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या योजनेत स्वत: लक्ष घालून चांगले काम केल्याची आठवण खासदार निंबाळकर व आमदार राऊत यांनी सभागृहात सांगितली. मी आमदार असताना कळंबमध्ये ६८ कोटींची कामे केल्याचेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले. पाणंद रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची सूचना पालकमंत्री विखे-पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com