Victim Balu Sawant sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav News : पंचायत समितीच्या आवारातच ठेकेदाराचा आत्महत्येचा प्रयत्न...

Satara police याची माहिती समजताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शांतीलाल ओंबासे व त्यांच्या नातेवाईकांनी सावंत यांना तातडीने वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अय्याज मुल्ला

-अय्याज मुल्ला

Waduj News : रोजगार हमी योजनेच्या कामाचे बील रखवडल्यामुळे जायगांव (ता.खटाव) येथील ठेकेदार बाळू रामचंद्र सावंत यांनी खटाव पंचायत समिती Khatav Panchayat Samiti आवारातच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या Police सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले.

याबाबत वडूज पोलिस ठाण्यातून समजलेली माहिती अशी की, जायगाव येथील ठेकेदार बाळू सावंत यांनी तीन वर्षांपूर्वी कोटेश्वर वस्ती शंकर मंदिर रस्ता व विहिरीचे काम केले होते. त्या कामाची मजुरी म्हणून त्यांनी बिले पाठवली होती. परंतु बिलासोबत प्रचलित धोरणानुसार काही गोष्टीची पूर्तता न केल्यामुळे त्यांना बिले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

बिले मिळवून देणी भागवावित यासाठी गेली दोन वर्षे ते कार्यालयात फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना कोणीही दाद दिली नाही. अखेर या नैराश्येपोटी त्यांनी पंचायत समितीच्या आवारातच खूर्चीवर बसून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

माहिती समजताच वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शांतीलाल ओंबासे यांनी सावंत यांना तातडीने वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटने संदर्भात रात्री उशीरापर्यंत वडूज पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT