Khatav News: जिहे-कटापूरची पाणी चोरी थांबवा; अन्यथा, हातात दांडकी घेऊ...

Pusegaon Farmers Andolan: कोरेगाव-खटावचे आमदार महेश शिंदे यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे जिहे-कटापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणात आले आहे.
Pusegaon Farmers Andolan
Pusegaon Farmers Andolansarkarnama

-Rushikesh Pawar

Pusegaon News : कोरेगाव-खटावचे Koregaon-khatav आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे जिहे-कटापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणात आले आहे. आमच्या हक्काचे आलेले पाणी पळविण्याचा घाट काही उपऱ्या अपप्रवृतींनी घातला आहे. मात्र, आमच्या सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. वर्धनगड घाटाखाली सुरु असलेली आमच्या पाण्याची चोरी त्वरित थांबवावी. अन्यथा, हातात दांडकी घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खटाव तालुका Khatav Taluka जिहे-कटापूर पाणी बचाव समितीच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी दिला.

पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कै. गुरुवर्य लक्ष्मणराव ईनामदार जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेचे खटाव-माणचे हक्काचे पाणी बेकायदेशीरपणे पळविणाऱ्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा खटाव तालुका जिहे-कटापूर पाणी बचाव समिती व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जाहीर निषेध केला.यावेळी लाभक्षेत्रातील पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, विसापूर, जाखणगावसह तालुक्यातील अनेक गावांमधील बाजारपेठांत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.

खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणात पडण्याआधीच रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील नागरिकांकडून एअर वॉल्व्हच्या माध्यमातून चोरले जात आहे. संबंधीत विभागाने खटावच्या दुष्काळी भागाच्या आरक्षित पाणी चोरीला आळा घालण्यासाठी हा एअर वॉल्व्ह कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांची मागणी विभागीय कार्यालकडे त्वरित कळविण्यात येईल. काम अपूर्ण असलेल्या जिहे-कटापूर योजनेची चाचणी सुरु आहे. या काळात मिळणारे सर्व पाणी नेर धरणात सोडण्यात येईल. वॉल्व्ह बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल. असे उपअभियंता मयुर महाजन यांनी निवेदन स्विकारल्यावर सांगितले.

Pusegaon Farmers Andolan
Satara : नागालॅंडमध्ये ठरलं तसं उद्या इथंही ठरेल; पण, वेट अँड वॉच : उदयनराजे

घोषणांनी परिसर दणाणून सोडला ....

आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे , पाणी गळती थांबलीच पाहिजे, अशा घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. अनेकांनी मनोगत व्यक्त करताना आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांचे नाव घेऊन तेच पाणी चोरीला पाठीशी घालत असल्याचे सांगितले.

माण-खटावच्या दुष्काळाला राष्ट्रवादीच जबाबदार

माजी जलसंपदामंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिहे-कटापूर योजनेसाठी काहीच केले नाही. त्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या अगोदरच्या सत्ताकाळात या भागातील पाणीयोजना रखडविण्याचे पाप करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय जलशक्ती विभागाकडे प्रयत्न केले. राज्यस्तरावर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करुन ही योजना त्यांनी मार्गी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com