Narendra Modi, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : नवी दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंचे मोदींना साकडे

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवीदिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्याचबरोबर लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या उद्घाटनासाठी येण्याचे आग्रही निमंत्रण दिले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj राष्ट्रीय स्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल. तसेच महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास जगभरात नेण्यासाठी अशा स्मारकांची गरज आहे. हे स्मारक भावी पिढिला प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

त्याचबरोबर लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेचा जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले. केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहे-कठापूरचा समावेश करण्याची विनंतीही दोघांनी मोदींना केली होती. पंतप्रधानांनीही लगेच जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राचा निधी देण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे ही योजना मार्गी लागली. त्यामुळे या योजनेचे उद्घाटनही त्यांचे हस्ते करण्याचा आग्रह खासदार उदयनराजे यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT