Udayanraje Bhosale : ''... त्यामुळे हा उद्रेक झाला आहे'' ; दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीनंतर उदयनराजेंचं विधान!

Maratha Reservation : ''...तर जातिजातीत तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले नसते.'' असंही उदयनराजेंनी बोलून दाखवलं.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale on Maratha Reservation : गेली 40 वर्षे मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे हा उद्रेक झाला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना न्याय देणे गरजेचे असून आज राजकारण सोडून या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. दिल्लीतील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

नवी दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदन येथे सोमवारी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षीय २३ खासदारांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Udayanraje Bhosale
Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंच्या पुढाकारातून सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव

या बैठकीनंतर उदयनराजे(Udayanraje Bhosale) म्हणाले, ''मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे सर्वांचं मत आहे. गेली चाळीस वर्षे लोटली तरी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, जरांगे पाटलांची हीच भूमिका आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभाव हा विचार होता, त्यानुसार सर्वांना वागणूक मिळाली पाहिजे. मराठा समाजाची वेगळी अपेक्षा नाही. पण, चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळाला पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण ठाम आहोत.''

याशिवाय ''गेली 40 वर्षे लोकांना न्याय मिळाला नाही त्यामुळे हा उद्रेक झाला आहे, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना न्याय देणे हे आमचे कामच आहे. आज राजकारण सोडून समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत आहे.

मराठा समाजाची भावना असेल तर त्यात चुकीचे काय ? असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ''मंडल आयोगाची स्थापना झाली त्यावेळीच हा प्रश्न सोडवायला हवा होता, कोणी सोडविला नाही? याच्या खोलात जायचे नाही. पण त्यावेळी हा प्रश्न सुटला असता तर जातिजातीत तेढ निर्माण झालेली पाहायला मिळाले नसते.

लोकांकडे मतदार म्हणून नको तर माणूस म्हणूंन बघा ते तुमच्या निश्चित पाठीशी उभी राहतील. जातपातीचे राजकारण असेच सुरू राहीले, तर ही लोकशाही समपुष्टात येईल व देशाचे तुकडे होतील.'' असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं

MP Udayanraje Bhosale
Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी काँग्रेसनेही ठोकले शड्डू ; पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी!

आजच्या बैठकीस 20 खासदार अनुपस्थितीत होते. याविषयी विचारले असते उदयनराजे म्हणाले, ''काही खासदाराना काही मिटिंग असतील, कार्यक्रम असतील त्यामुळे ते आले नाहीत त्यामुळे त्यांचा पाठिंबा नाही असा अर्थ कोणी काढू नका.'' तसेच, दहा वर्षांनंतर जातीनिहाय जनजणना झाली पाहिजे ती करावी. त्याची श्वेतपत्रिका काढा हा प्रश्न आपोआप संपेल. या पलीकडे तुमच्याकडे काहीही पर्याय नाही.'' असेही त्यांनी नमूद केले

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com