Teachers Bank Satara
Teachers Bank Satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी विक्रमी ४२५ इच्छुकांचे अर्ज

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ५३ अर्ज दाखल झाले. त्यामुळे बँकेच्या संचालकांच्या २१ जागांसाठी एकुण ४२५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्याप्रमाणात प्रथमच अर्ज दाखल झाल्याने पॅनेल अंतिम करताना शिक्षक संघ, शिक्षक समिती व परिवर्तन आघाडीच्या नेत्यांची कसरत होणार आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी गेल्या तीन दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज अर्जाच्या अखेरच्या दिवशी ५३ अर्ज दाखल झाले असून राखीव जागांसाठी ३० तर सर्वसाधारण प्रवर्गातून ३३ अर्जांचा समावेश आहे. आतापर्यंत राखीव पाच जागांसाठी १६७ तर सर्वसाधारणच्या १६ जागांसाठी २५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे महिलांच्या दोन जागांसाठी तब्बल ५६ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत दाखल झालेले प्रवर्गनिहाय अर्ज संख्या अशी आहे. आतापर्यंत दाखल झालेले प्रवर्गनिहाय अर्ज संख्या अशी आहे. राखीव मतदारसंघ ः अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग -३३, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गा ४६, इतर मागास प्रवर्ग ३२, महिला राखीव ५६.

सर्वसाधारण मतदारसंघातून कराड १७, नागठाणे १०, आरळे १५, परळी १२, जावळी १३, महाबळेश्वर सहा, वाई १२, खंडाळा ३१, फलटण १८, गिरवी तरडगाव २७, कोरेगाव १३, रहिमतपूर १७, खटाव १९, मायणी २४, दहिवडी १३, म्हसवड ११ अशा २५८ अर्जांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT