मोरगिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विकासकामांना मतदारांनी कौल दिल्याने ६० वर्ष पाटणकरांच्या ताब्यात असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत देसाई गटाने सत्तांतर घडवून सरपंच पदासह सर्वच्या सर्व आठही जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यामुळे मोरणा विभागात बाळासाहेबांची शिवसेना जोमात तर राष्ट्रवादी कोमात असल्याचे संकेत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाले आहेत.
पाटण तालुक्यातील मोरणा विभाग हा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच विभागातील मोरगिरी ग्रामपंचायत ही पाटणकर गटाच्या प्रमुख कार्यकर्ते यांची बलस्थान होती. मातब्बर असलेली कार्यकर्त्यांची फळी आणि जवळ जवळ ६० वर्ष एक हाती सत्ता ही पाटणकर गटाच्या ताब्यात होती.
नुकत्याच झालेल्या मोरगिरी ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडवत पाटणकर गटाच्या भैरवानाथ विकास पॅनेलचा दारूण पराभव केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामपंचायतीची सत्ता नसताना जवळ जवळ १.२५ कोटीची विकासकामे या गावात केली.
त्यांच्या विकासकामांना मतदारांनी कौल दिल्याने ६० वर्ष पाटणकराच्या सत्तेला फार मोठे खिंडार पाडल्याचे निवडणुकीत स्पष्ट झाले. या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून अर्चना किरण गुरव या निवडून आल्या. त्यांनी जवळपास पावणे तीनशे मतांनी विजय मिळवला. ही बाब पाटणकर गटांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी व त्यांनी केलेल्या घोषणेबाबत धक्कादायक मानली जात आहे.
तर ग्रामपंचायतीमध्ये पाटणकरांच्या एक हाती सत्तेला गावातील ग्रामस्थ कंटाळले होते. बदल व्हावा अशी लोकांची मानसिकता तयार झाली होती तर सत्ता नसताना मंत्री देसाई यांनी केलेली १.२५ कोटीची विकास कामे पाहता मोरगिरी ग्रामपंचायतीत देसाई गटाने सत्तांतर घडवून सरपंच पदासह सर्वच्या सर्व आठही जागा जिंकत ग्रामपंचायतीत निर्विवाद वर्चस्व मिळवले.
पाटणकर गटाला एकही जागा जिंकता आली नसल्याने त्यांचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे मोरणा विभागात बाळासाहेबांची शिवसेना जोमात तर राष्ट्रवादी कोमात असल्याचे संकेत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाले आहे. यामध्ये सचिन कृष्णाजी मोरे, सरीता कृष्णत कुंभार, वैशाली सचिन मोरे, संदीप गजानन सुतार, सुनिता सुरेश गुरव, जगन्नाथ परशराम माने, निर्मला रावसाहेब चव्हाण हे नवनिर्वाचित उमेदवार म्हणून निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.