Sanjay Raut On Ajit Pawar  SC Final Decision On ShivSena
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : '' अजितदादांसारख्या स्वाभिमानी नेत्याचा राऊतांकडून राजरोसपणे अपमान सुरू...'' ; 'या' नेत्यानं ठिणगी टाकली

Maharashtra Politics : '' एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही नेते ताकदीचे नेते...''

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : मागील काही दिवसांपासून ठाकरे गट सातत्यानं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर निशाणा साधत आहे. खासदार संजय राऊतांनीही अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील फेरबदलांमध्येही अजित पवारांना स्थान देण्यात आलेले नाही. यावरुनही ठाकरे गटानं त्यांना डिवचलं होतं. आता शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी अजितदादांवरील टीकेवरुन राऊतांवर टीका करत ठाकरे गट व राष्ट्रवादीत वादाची ठिणगी टाकली आहे.

शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. सामंत म्हणाले,जे लोक आमच्यावर सकाळी उठून टीका करतात. ते लोक आता राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला द्यायला निघालेले आहेत, ते शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सल्ला देऊ लागलेले आहेत. तसेच आमच्यावर विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आता अजितदादांवरदादांच्या विश्वासाहर्तेवर बोलू लागले आहेत.

अजितदादा हे का सहन करत आहेत ?

संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यासारखा माणूस अजितदादांवर बोलतोय आणि तरीही ते ऐकून घेतात. हे महाराष्ट्रासमोरचं कोडं आहे अजितदादांसारख्या स्वाभिमानी नेत्याचा राजरोसपणे 'सामना'मधून अपमान सुरू आहे, याच्याबद्दल मला खंत वाटते. अजित(Ajit Pawar) दादा एवढं का सहन करत आहेत हे मला खरोखरच कळत नाही.

...त्यांनी उरलेले कसे वाचतील याचा विचार करावा !

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे नेहमीच शिंदेगटावर सडकून टीका करत असतात. यावरुन सामंतानी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, आमच्यावर बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही आणि जे संपलेले आहे त्यांनी उरलेले कसे वाचतील याचा विचार करावा असा टोलाही सामंत यांनी ठाकरेंसह राऊतांना लगावला.

दोन्हीही नेते ताकदीचे...

राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकलेली आज( दि.१३)ची जाहीरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. यावर मंत्री सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये जी जाहिरात आलेली आहे. ती शिवसेनेमार्फत देण्यात आलेली आहे. त्यावर कोणीही गैरसमज करून घेऊ नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही नेते ताकदीचे नेते आहेत. त्यामुळे कुठेही संभ्रम निर्माण होत नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT