Sanjay Raut News : संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांच्या मर्मावर बोट; म्हणाले, "शिंदेंना बाळासाहेबांचा विसर..."

CM Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना हा त्यांच्या फुगा फुटला
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Targets Eknath Shinde on Ad : राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आज मंगळवारी (ता. १३) झळकलेली जाहिरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

या जाहिरातील शिवसेना आणि भाजपला जनतेची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याचाही दावा केला आहे. जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला आहे. दरम्यान, ही जाहिरात एका खासगी वृत्तवाहिनीची असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. या जाहिरातीमुळे काँग्रेसने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेनेने खोटा सर्व्हे केल्याचे म्हटले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्मावर बोट ठेवले.

Eknath Shinde, Sanjay Raut
Shivsena Advertisement News : शिंदे अन् फडणवीस दोघेही ताकदीचे नेते; जाहिरातीवरून उदय सामंतांची सारवासरव

गेल्या वर्षी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बगल दिली. ठाकरेंनी काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. ठाकरे यांची ही भूमिका आवडली नाही. त्यातूनच बाळासाहेबांचे विचार कायम तेवत ठेवण्यासाठी बंड केल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्व आमदारांनी वारंवार मांडली. आता जाहिरात करताना मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना बाळासाहेबांचा विसर पडल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

Eknath Shinde, Sanjay Raut
Harshvardhan Jadhav Warn News : चढ्या दराने खत विक्री केली, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला मागे पुढे पाहणार नाही..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह प्रसिद्ध झालेल्या मंगळवारच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात राऊत म्हणाले, "कोट्यावधी रुपये खर्च करून केलेली शिवसेनेने आज जाहिरातबाजी केली आहे. या आनंदाच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका विसर पडला. यामुळे आम्हीच शिवसेना (Shivsena) हा त्यांचा फुगा फुटला आहे."

बाळासाहेबांचा फोटो टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे धाडस नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले, "जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापायला त्यांची तंतरली. मोदी शहांचे इतके भय? बाकी ते सर्व्हे वगैरे फडणवीस यांचे चघळायचे विषय आहेत. मात्र बाळासाहेबांचा फोटो टाकायला मुख्यमंत्री यांचे धाडस झाले नाही, हे त्यांनी मान्य करावे. 'ये पब्लिक हैं...सब जानती है."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com