करवीर तालुक्यात मतदारांना वाटण्यासाठी आणलेला साड्यांचा टेम्पो भरारी पथकाने जप्त केला.
साड्यांच्या पिशव्यांमध्ये उमेदवारांचे फोटो आणि प्रचार साहित्य आढळल्याने आचारसंहितेच्या उल्लंघनाचा संशय वाढला.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीय वादाचा विषय ठरली आहे.
Kolhapur News : राज्यात नुकताच महानगरपालिकेंच्या निवडणुकींचा निकाल लागला असून महायुती सरस ठरली आहे. अने महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला असून आता महापौर निवडीकडे शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या यासाठी राजकीय पक्षांमध्ये खलबत केली जात असून लवकरच महापालिकेंच्या महापौर पदावरून पडदा उठणार आहे. यात कोल्हापूर महापालिकेचा देखील समावेश आहे. दरम्यान आता कोल्हापुरमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भरारी पथकाने पाठलाग करत तब्बल पाच लाख रुपये किमतीच्या साड्या असलेला टेंम्पो जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 68 गट आणि पंचायत समितीचे 136 गणांसाठी 5 फेब्रुवारी मतदान होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासाठी सध्या राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उमेदवार जाहीर करण्यात आले असून 27 तारखेला माघारीचा दिवस आहे. या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या सर्वच उमेदवार प्रचारात उतरले असून महायुतीसह महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाड्यांनी प्रचाराकडे लक्ष देत मतदारांपर्यंत पोहचण्याकडे लक्ष दिले आहे.
दरम्यान करवीर तालुक्यातील वाशी गावात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पथकाने येथे धाड टाकून तब्बल पाच लाख रुपये किमतीच्या साड्या जप्त केल्या आहेत. या साड्या मतदारांना वाटण्यासाठी आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असून भरारी पथकाची चाहूल लागताच चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने तो टेम्पो पाठलाग करू ताब्यात घेतला.
यावेळी तब्बल पाच लाख रुपये किमतीच्या साड्या टेम्पोत असल्याचे उघडकीस आले. अशा पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसत आहे. तर ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यांनी संपूर्ण पंचनामा प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त केला.
या संदर्भात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, यामागे कोणाचा हात आहे आणि त्या नेमक्या कुणासाठी होत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या बाबत माहिती घेतली असता तपास पथकाकडून या साड्या एका जावळाच्या कार्यक्रमासाठी नेत असल्याचे समोर आले असून साड्यांचे बिल आणि इतर कागद पत्रे देखील जमा करण्यात आली आहे. तरीही सध्या साड्यांचा साठाआणि टेम्पो जप्त करण्यात आला असून सध्या तरी याचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी दिसत नाही, असेही माहिती निवडणूक आयोगाच्या पथकांकडून देण्यात आली आहे.
FAQs :
1) कोल्हापूरमध्ये भरारी पथकाने काय कारवाई केली?
👉 करवीर तालुक्यात साड्यांनी भरलेला संशयास्पद टेम्पो अडवून तपासणी करण्यात आली आणि साड्या जप्त करण्यात आल्या.
2) साड्या वाटपाचा उद्देश काय होता?
👉 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना साड्या वाटप करण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
3) साड्यांच्या पिशव्यांमध्ये काय आढळले?
👉 साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि प्रचार हँडबिल्स आढळले.
4) ही घटना निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे का?
👉 निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून आचारसंहितेच्या उल्लंघनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
5) या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 या प्रकरणामुळे संबंधित उमेदवार आणि पक्षावर कारवाई होण्याची शक्यता असून निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.