Zilla Parishad Elections : ऐन रणधुमाळीत भाजपला कोंडीत टाकणारा काँग्रेसचा निर्णय, स्वाभिमानीशी गट्टी करत युती घोषणा; शिरोळचे राजकीय गणितं बदलणार?

Congress & Swabhimani Alliance in Shirol : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून शिरोळ तालुक्यात काँग्रेस–स्वाभिमानीने युती करत दंड थोपाटले आहे.
Zilla Parishad Elections
Zilla Parishad Electionssarkarnama
Published on
Updated on
Summary
  • शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे.

  • काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाची युती निश्चित झाली असून भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

  • भाजपच्या निर्णयानंतरच लढत दुरंगी की तिरंगी होणार, हे ठरणार आहे.

Shirol New : गणेश शिंदे

शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. आमदार यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडी विरोधात सर्वपक्षीय असे चित्र पालिका निवडणुकीत होते. यावेळी मात्र, काँग्रेस-स्वाभिमानीची गट्टी जमली असताना भाजपची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट आहे. भाजपच्या भूमिकेनंतरच शिरोळ तालुक्यात लढतीचे चित्र दुरंगी की, तिरंगी हे स्पष्ट होणार आहे.

तीन-चार वर्षांपासून अनेकांनी जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी केली. मात्र, आरक्षण बदलले अन् अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद मतदारसंघांत ऐनवेळी नवे चेहरे दिसणार आहेत. तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी विरोधात भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी संघटनेने दंड थोपटले होते. मात्र, संमिश्र यशामुळे निवडणुकीची गणिते बांधताना कठीण बनत आहे.

पालिकांच्या निवडणुकीत नेत्यांनी आपल्या पक्षाची ताकद आजमावली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही 'जयसिंगपूर पॅटर्न' राबवायचा की, पक्षीय राजकारण याबाबत ठोस अशी भूमिका व्यक्त होत नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून विविध सभापती पदांपर्यंतचा मान मिळविणाऱ्या शिरोळ तालुक्यात आरक्षणामुळे अनेक बदल दिसणार आहेत.

Zilla Parishad Elections
Zilla Parishad Election 2026: शिवसेना-भाजप युतीनंतर महाविकास आघाडीचही जमलं

दानोळी, यड्राव, नांदणी, अब्दुललाट मतदारसंघात आरक्षण बदलले अन् तयारी केलेल्या इच्छुकांची कोंडी झाली. नेत्यांनी कुटुंबीय आणि पै-पाहुण्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्याच्या पश्चिमेकडील यड्राव मतदारसंघही आरक्षित झाल्याने येथे चुरस पाहायला मिळणार आहे. दानोळी मतदारसंघ अनुसूचित जाती महिलेसाठी असल्याने या ठिकाणी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम केलेल्या उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.

अब्दुललाट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून, येथे नेत्यांकडून इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. आलास मतदारसंघ खुला झाल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी आणि जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती सावकर मादनाईक यांच्या 'होम पीच'वरील उदगाव मतदारसंघातील लढत जिल्ह्यातील चुरशीची ठरणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे तसेच नेत्यांची प्रतिष्ठा लागणार असल्याने अनेक इच्छुकांकडून तयारी सुरू झाली आहे. सात जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती गणांसाठी स्थानिक आणि पक्षीय पातळीवरील नेत्यांनी कंबर कसली आहे. आगामी ग्रामपंचायती, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने तालुक्यात नेत्यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

त्यामुळे कोथळी, अब्दुललाट येथील निवडणूक नेत्यांना विशेष लक्ष देऊन लढावी लागणार आहे, तर खास करून सर्वसाधारण जागांसाठी उमेदवार देण्यापासून विजय खेचून आणण्यापर्यंत नेत्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला आरक्षित असल्याने दत्तवाडमधील लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने उमेदवारी मिळविणे, प्रचाराच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचणे, पक्षातील गटबाजी संपविणे, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन यंत्रणा हाताळावी लागणार आहे. या काळात गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना विशेष महत्त्व येणार आहे.

सध्या तरी काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटना हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत बरोबर असलेली भाजपची भूमिका आता या निवडणुकीत गुलदस्त्यात आहे. भाजपचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार असल्याने सध्या तरी काँग्रेस, स्वाभिमानीबरोबर भाजप असणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भाजपच्या भूमिकेवरच दुरंगी की, तिरंगी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. दोन-तीन दिवसांत सर्वच पक्षांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात तालुक्यात एकूण मतदान केंद्रे २३

एकूण मतदान २ लाख ४० हजार १०२

इतर मतदान - २

पुरुष मतदार - १,१९,२७२

महिला मतदार - १,२०,८२८

जिल्हा परिषद गटांचे बलाबल

भाजप - शिरोळ, नांदणी, अब्दुललाट

काँग्रेस - दत्तवाड

जुने राष्ट्रवादी - आलास

जुनी शिवसेना - उदगावजिल्हा परिषद गट असे

दानोळी, उदगाव, आलास, नांदणी, यड्राव, अब्दुललाट, दत्तवाड

पंचायत समिती

काँग्रेस, राष्ट्रवादी - प्रत्येकी ३

स्वाभिमानी - ४

शिवसेना - २

अपक्ष - १

पंचायत समिती गण

नांदणी, चिपरी, यड्राव, शिरढोण, अब्दुललाट, अकिवाट, दत्तवाड, सैनिक टाकळी, दानोळी, कोथळी, उदगाव, अर्जुनवाड, आलास, गणेशवाडी.

२०१७ चे जिल्हा परिषद बलाबल

भाजप - ३

काँग्रेस - १

राष्ट्रवादी - १

शिवसेना - १

स्वाभिमानी शेतकरी संघटना - १

पंचायत समितीतील

२०१७ चे बलाबल

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी - ६ (प्रत्येकी तीन)

स्वाभिमानी संघटना - ४

शिवसेना - २

अपक्ष - १

Zilla Parishad Elections
Zilla Parishad elections : मतदान सुरू असतानाच भाजपने डाव टाकला; कोकणात अजितदादांसह शिंदेंना धक्का

FAQs :

1) शिरोळ तालुक्यात कोणत्या निवडणुका होत आहेत?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.

2) काँग्रेस कोणासोबत युतीत आहे?
काँग्रेसची स्वाभिमानी पक्षासोबत युती झाली आहे.

3) भाजपची भूमिका काय आहे?
भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

4) निवडणूक दुरंगी की तिरंगी कशावर अवलंबून आहे?
भाजप कोणती भूमिका घेते, यावर लढतीचे स्वरूप ठरणार आहे.

5) यापूर्वी पालिका निवडणुकीत चित्र कसे होते?
पालिका निवडणुकीत आमदार यड्रावकर यांच्या आघाडीविरोधात सर्वपक्षीय लढत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com