Vitthal Sugar Factory-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil Group Meeting : ‘विठ्ठल’वरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी बोलावली समर्थकांची बैठक; निर्णयाकडे लक्ष

State Cooperative Bank Action on Vitthal Sugar Factory : राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 April : राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. बॅंकेच्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांनी विश्वासू कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे थकीत आहेत. त्या प्रकरणी बॅंकेने कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीत कारवाईला दिलेली स्थगिती उठवली आणि राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vitthal Sugar Factory) तीन गोदामे आणि कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्य सहकारी बॅंकेने कारवाई केल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कारवाईवेळी अभिजित पाटील (Abhijeet Patil) हे शरद पवार यांच्या करमाळ्यातील सभेत होते. ही बातमी समजताच पाटील हे सभा अर्धवट सोडून पंढरपुरात दाखल झाले होते. ते दिवसभर तणावात होते. मात्र, त्यांनी हिमत हरली नव्हती. शेतकऱ्यांचे देणे स्वतःला गहाण ठेवून देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

राज्य सहकारी बॅंकेच्या (State Cooperative Bank) कारवाईनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि अभिजित पाटील गटात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली. त्या बैठकीत कारवाईबाबत चर्चा झाली. संचालक मंडळाने निर्णय घेण्याचे अधिकार हे अभिजित पाटील यांना दिले आहेत.

दरम्यान, बॅंकेने जप्त केलेला कारखाना आणि साखर ताब्यात घेण्यासाठी अभिजित पाटील यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कायदेशीर मार्गाची चाचपणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अभिजित पाटील यांनी आपल्या गटाची बैठक कारखान्यावर बोलावली आहे. त्या बैठकीला अभिजित पाटील यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. बैठकीत कोणता निर्णय होणार, याची उत्सुकता पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याला लागून राहिली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT