Abhijeet Patil Reaction : ‘विठ्ठल’वरील कारवाईनंतर अभिजित पाटलांचे शेतकऱ्यांना वचन; ‘स्वतःला गहाण ठेवू; उसाचं बिल देऊ’

Vitthal Sugar Factory MSC Bank Action : लोकसभेची निवडणूक सुरू असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई होत आहे, याबाबत जनतेनं काय ते समजून घ्यावं. पण, आम्ही यातूनही मार्ग काढत आहोत.
Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Abhijeet Patil-Vitthal Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 April : थकीत कर्जप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली असताना कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मात्र येत्या दोन दिवसांत तोडगा काढण्यात येईल. वेळ पडली तर स्वतःला गहाण ठेवू. पण विठ्ठल कारखाना सुरू ठेवू आणि शेतकऱ्यांची उसाची देणी देण्यात येतील, असे सांगितले.

अभिजित पाटील (Abhijeet Patil) म्हणाले, राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vitthal Sugar Factory) तीन गोदामे जप्त केली आहेत. मी करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त आयोजित शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेत होतो. मला अचानक फोन आला, त्यानंतर मी पंढरपूरमध्ये आलो. त्यावेळी कारखान्याची तीन गोदामे जप्त करण्यात आल्याची दिसून आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Vitthal Sugar Factory : पवार सोलापूर जिल्ह्यात असतानाच अभिजित पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई

गेली तीन ते चार महिन्यांपासून राज्य सहकारी बॅंकेची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई सुरू होती. त्याविरोधात आम्ही बीआरटी न्यायालयात गेलो होतो. पण, गुरुवारी रात्री न्यायालयाने कारवाईवरील स्थगिती उठवली आणि आज तडकाफडकी बॅंकेने गोदामे सील केली आहेत. बॅंकेने ही कारवाई केल्याने शेतकऱ्यांची बिलं देण्यासाठी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यातून कारखाना अडचणीत आणण्याची भूमिका घेतल्याचं वाटतं आहे, अशी शंकाही अभिजित पाटील यांनी बोलून दाखवली.

ते म्हणाले, विठ्ठल सहकारी काखान्यात निवडून आल्यापासून आम्ही एक नया पैशाचे कर्ज घेतलेले नाही. मागील संचालक मंडळाने कर्ज घेतलं होतं आणि थकवलं आहे. राज्य सहकारी बॅंकेचे विठ्ठल सहकारी साखर काखान्यावर 430कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे, त्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

लोकसभेची निवडणूक सुरू असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई होत आहे, याबाबत जनतेनं काय ते समजून घ्यावं. पण, आम्ही यातूनही मार्ग काढत आहोत. वकिलांशी चर्चा करून तसेच बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून काही मार्ग निघतोय का, हे आम्ही पाहत आहोत. कारखान्याच्या गोदामात एक लाखभर पोती साखर असतील, असेही पाटील यांनी नमूद केले.

Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Solapur Lok Sabha 2024 : मोदी-ठाकरे-पवारांची सोलापूरमध्ये एकाच दिवशी होणार सभा

अभिजित पाटील म्हणाले, कारवाईमुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. शेतकऱ्यांच्या उसाचे सर्व बिल दिले जाईल. येत्या दोन दिवसांत त्यावर तोडगा काढण्यात येईल. कारखान्याच्या सर्व सभासदांना वचन देतो की, वेळ पडली आम्ही स्वतःला गहाण ठेवू. कोणतीही किंमत मोजावी लागली, काहीही निर्णय घ्यावा लागला तरी तो घेऊ; पण शेतकऱ्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे, चालला पाहिजे आणि जिल्ह्यात ऊसदराची स्पर्धा लागली पाहिजे, यासाठी आम्ही आमच्या जिवाचे रान करू.

R

Abhijeet Patil-Vitthal Sugar Factory
Pawar Attack On Modi : महाराष्ट्राला चारा दिला म्हणून मोदींनी ‘अमूल’च्या प्रमुखांवर खटला भरला; पवारांचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com