Solapur, 05 May : आम्ही त्या बाजूला (राष्ट्रवादी काँग्रेस) होतो, तेव्हाही प्रामाणिक होतो, त्या काळात आम्ही तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) कधीही भेटलो नाही. आता तुमच्यासोबत आलो आहोत. या बाजूलाही प्रमााणिक राहू. आता एक आणि बाहेर एक असे आम्ही करणार नाही. आमच्या भागातून जास्तीत जास्त मतदान करून आपण जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, अशा शब्द विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभेत दिला.
महायुतीचे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) कार्यस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी हा शब्द दिला. या सभेला आमदार शहाजी पाटील, महादेव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवाजी सावंत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईनंतर आम्ही मदत मागण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो. त्या वेळी आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यावेळी ‘आम्हाला मदत करणार असाल, तर पुढच्या हंगामापर्यंत कारखान्याचे सर्व विषय जसे की व्याजाची सवलत, एनसीडीसीच्या माध्यमातून मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळे काखान्याबाबत आता आम्हाला निश्चिंत वाटायला लागलं, असेही पाटील यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला विधानसभेचे तिकिटही जाहीर झालं होतं. त्यामुळे मला आमदार झाल्यारखं वाटायचं, असे मी भाषणातही म्हटलं होतं. पण, आमदारकी डावावर लागली तर चालेल; पण कारखाना वाचाला पाहिजे, अशी भूमिका मी घेतली. सभासदांच्या विश्वासाशी प्रामाणिक राहण्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.
सीर्फ हंगाम खडा करना मक्सद नही मेरा, कोशिश ये है की ये सूरत बदलनी चाहिए, असा डायलॉगही अभिजित पाटील यांनी ऐकवत आपली भूमिका स्पष्ट केले. विठ्ठल साखर कारखान्यासाठी आपण सढळ हाताने मदत करावी, कारखान्याला जीवदान द्यावं. सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावं ही विनंती करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.