Beed Lok Sabha : पुरोगामी, कम्युनिस्टांसह परजिल्ह्यातील नेत्यांच्या गळ्यात बीडकरांनी घातली खासदारकीची माळ

Lok Sabha Election 2024 : ब्राह्मण समाजातील जिल्ह्याचे पहिले खासदार झालेले परांजपे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील शिलेदार होते. पुढच्या निवडणुकीत धनगर समाजाचे रखमाजी गावडे पाटील हे काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले.
Beed Former MP
Beed Former MPSarkarnama

Beed, 05 May : राजकीय संवेदनशिल असलेला बीड जिल्हा पुरोगामी विचारांचा असल्याने डावे, शेतकरी चळवळीतील नेत्यांनाही जिल्ह्याने संधी दिली. विशेष म्हणजे परजिल्ह्यातून येऊन बीड लोकसभेच्या राजकीय फडात उतरलेल्या नेत्यांवरही बीडकरांनी गुलाल उधळताना स्वजिल्ह्यातल्या उमेदवारांचा पराभव केला, हे विशेष. मारवाडी, ब्राह्मण, तेली, धनगर अशा छोट्या समाजातील नेत्यांनाही खासदार करण्याचे मनाचे औदार्य बीडकरांनी दाखविले. काँग्रेस, डावे, शेतकरी, नंतर काँग्रेस व अलिकडे भाजप-राष्ट्रवादी अशी राजकीय ताकद जिल्ह्यात आहे. भाजपचे १९९६ च्या निवडणुकीत लोकसभेला बीडमधून खाते उघडले.

देशात लोकशाही आली आणि १९५२ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक (Lok Sabha Election) झाली. देशभरात काँग्रेसचे (Congress) वारे होते. मात्र, बीड जिल्ह्यात या निवडणुकीत पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाचे रामचंद्र परांजपे काँग्रेसच्या श्रीधर नाईक यांचा पराभव करून विजय मिळविला. ब्राह्मण समाजातील जिल्ह्याचे पहिले खासदार झालेले परांजपे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील शिलेदार होते. पुढच्या निवडणुकीत धनगर समाजाचे रखमाजी गावडे पाटील हे काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Beed Former MP
Solapur Police : सोलापूर पोलिसांचा दणका; लोकसभा मतदानाच्या तोंडावर राजकीय नेत्यांसह 32 जण हद्दपार

दरम्यान, नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीसिंह नाना पाटील (Krantisinha Nana Patil) यांचे प्रतिसरकार माहीत आहे. तर, नव्या राजकीय इतिहासात बीड जिल्हा काँग्रेसनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजपचा (BJP) गड असल्याचे वाटते. मात्र, जिल्ह्यात समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मॅक्सीस्ट) यांनाही जिल्ह्यात मोठा जनाधार होता. विशेष म्हणजे कम्युनिस्ट पार्टीकडून सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी दिवंगत क्रांतीसिंह नाना पाटील यांनाही १९६७ मध्ये लोकसभा निवडणुकीत जिल्हावासियांनी लोकसभेवर पाठविले.

विशेष म्हणजे त्यांनी जिल्ह्यातील रहिवासी व काँग्रेस उमेदवार द्वारकादास मंत्री यांचा पराभव केला. असाच दुसरा धक्कादायक निकाल १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत लागला. नगर जिल्ह्यातील बबनराव ढाकणे जनता दलाकडून बीड लोकसभेच्या रिंगणात उतरले. त्यांचा सामना तत्कालिन काँग्रेसच्या खासदार व मातब्बर नेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्याशी झाला. या निवडणुकीत जिल्हावासियांनी बबनराव ढाकणे यांना गुलाल लावला.

Beed Former MP
Ranjeetsingh Nimbalkar News : खासदार निंबाळकरांनी मोहिते-पाटलांच्या मुळावरच घाव घातला; रणजितसिंह यांच्यावरही बसरले

लोकसभेच्या १९७१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सयाजीराव पंडित विजयी झाले. त्यांना तब्बल १ लाख ८७ हजार १३२ मते मिळाली होती. तर, विरोधातील कम्युनिस्ट पार्टीचे गंगाधरअप्पा बुरांडे यांना २३ हजार ५५१ मते मिळाली होती. मात्र, पुढच्या १९७७ मधील लोकसभा निवडणुकीत गंगाधरअप्पा बुरांडे यांनी तब्बल १ लाख ९७ हजार ४९७ मते मिळवून काँग्रेसच्या लक्ष्मण देशमुख यांचा पराभव केला. १९६२ च्या निवडणुकीत मारवाडी समाजातील द्वारकादास मंत्री विजयी झाले. त्यांची लढत कम्युनिस्ट पक्षाचेच बाबर आतार यांच्यासोबत झाली होती. एकूणच जिल्ह्याचे समाजवाद, शेतकरी चळवळ, डाव्या चळवळीला पाठबळ दिल्याचे निकालांवरून दिसते.

Beed Former MP
Solapur News : राष्ट्रवादीला महायुतीत योग्य सन्मान; विधानसभेला मिळणार 90 जागा : उमेश पाटील यांचा दावा

आयात उमेदवारांवर भाजप, राष्ट्रवादीचा पहिला विजय

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व १९९० च्या दशकात बहरात येत होते. शिवसेना-भाजप युतीची १९९५ मध्ये सत्ता आली व ते उपमुख्यमंत्री झाले. तोपर्यंत जिल्ह्यात भाजपने लोकसभेला खाते उघडलेले नव्हते. लोकसभेच्या १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत दिवंगत मुंडेंनी आताच्या काँग्रेस खासदार व तेव्हा काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या असलेल्या रजनी पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली. श्रीमती पाटील यांनी त्यापूर्वी तीन वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव केला. तर, १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. पक्षाने २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपमधून आलेल्या जयसिंगराव गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपचे प्रकाश सोळंके यांचा पराभव केला. बीड मतदार संघावर २००४ नंतर सातत्याने भाजपचे वर्चस्व राहिले.

ढाकणेंमुळे प्रथम केंद्रात मंत्रिपद

बबनराव ढाकणेंच्या माध्यमातून लोकसभा स्थापन झाल्यानंतर ३७ वर्षांनी बीड जिल्ह्याला प्रथम केंद्रात मंत्रिपद मिळाले. पुढे जयसिंगराव गायकवाड, दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे देखील केंद्रात मंत्री झाले.

Edited By : Vijay Dudhale

Beed Former MP
Sangli Lok Sabha : विश्वजित कदम वाघच; पण सांगलीत वारं फिरलंय, माझा विजय निश्चित : विशाल पाटलांचा राऊतांना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com