Pandharpur, 27 July : आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाची सत्ता मोडून काढून नवे नेतृत्व तयार होण्यासाठी आम्ही निवडणूक लढविणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, हे सांगताना त्यांनी आमदार समाधान आवताडे, भगीरथ भालके यांच्याकडेही मैत्रीचा हात पुढे केला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपूर नगरपरिषदेतील सत्ता मोडीत काढण्यचा निर्धार केल्याचे दिसून आले.
आमदार पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक मला आमदार करण्यासाठी होती. मला आमदार होण्यासाठी ज्यांनी काम केले, त्यांची ही निवडणूक आहे. माझ्या सहकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी मी दहा पावले मागे यायला तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कमीपणा घ्यायला तयार आहे. पंढरपूर नगरपालिकेत नवं नेतृत्व तयार होण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. तेथील कारभार चांगला करून नागरिकांच्या स्वप्नातील पंढरपूर (Pandharpur) घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
समाधान आवताडे हे आमदार असून त्यांची दुसरी टर्म आहे. पण, आमदार म्हणून ते ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये एस्टाब्लिस्ट होणं अपेक्षित होतं किंवा पंढरपूरच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असायला पाहिजे होते, तसे ते दिसतात का? हे सर्वांना माहिती आहे. नगरपालिका निवडणुकीत जर एकीचा निर्णय होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने आपण एक हात पुढे केला पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले.
पंढरपुरात चुकीचं घडतंय, असं आमदार समाधान आवताडे यांना वाटत असेल अथवा त्यांना इथं बरोबर घडतयं, असं वाटत असेल तर ती त्यांची एक राजकीय सेटलमेंट आहे, तर तो त्यांचा निर्णय घेतील. पण, समाधान आवताडे यांना पंढरपूर शहराबाबत किंवा नगरपालिकेत सत्तांतराबाबत होण्याबाबत आत्मीयता असेल तर ते आमच्यासोबत येतील. त्यामुळे युतीचा चेंडू आमदार आवताडेंच्या कोर्टात आहे, असेही आमदार अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.
भगीरथ भालकेंसोबत एकत्र येण्याबाबत चर्चा
ते म्हणाले, भगीरथ भालके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन एकत्र बसलो होतो. त्यांच्याशी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. त्यात त्यांना माझी कुठलीही अट नाही, असे सांगितले आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. ते सर्व एकत्र आले, तर एकत्र होऊन नगरपालिकेची निवडणूक लढविली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.