High Court News : पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण केले नाही ; अभियंत्यांना खंडपीठाची नोटीस..

Paithan-Pandharpur Palkhi route work delayed; High Court issues notice to engineers : सदरील मार्गाचे काम सुरू होऊन आठ वर्षे उलटली तरीही अनेक ठिकाणी सदरील रस्त्याचे काम अर्धवट आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने लोकांना धुळीचा व खड्ड्याचा प्रचंड त्रास होत आहे.
Bombay High Court bench Aurangabad News
Bombay High Court bench Aurangabad NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : पैठण पंढरपूर पालखी मार्गाचे काम ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले होते. मात्र हे काम वेळत न झाल्याने दाखल अवमान याचिकेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी व न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे यांनी दिले आहेत.

पैठण (Paithan) पंढरपूर पालखी मार्गाचे 2017 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते. हा महामार्ग पैठण मुंगी, बोधेगाव, घोगसपारगाव, उखंडाचकला, मिडसांगवी, शिरूर कासार, राक्षस भुवन, कारेगाव, डोंगरकिन्ही, चुंबळी, पाटोदा, पारगावघुमरा, दिघोळला जोडला जाऊन पुढे तो खर्डा मार्गे पंढरपूरकडे जाणारा आहे.

सदरील मार्गाचे काम सुरू होऊन आठ वर्षे उलटली तरीही अनेक ठिकाणी सदरील रस्त्याचे काम अर्धवट आहेत. (High Court) अनेक ठिकाणी रस्ता खोदल्याने लोकांना धुळीचा व खड्ड्याचा प्रचंड त्रास होत आहे. सदर मार्गामुळे या भागातील लोकांना दळणवळणासाठी आणि मुख्यतः वारकऱ्यांना पैठण ते पंढरपूर वारीसाठी सोयीचे होणार आहे.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : खासदार भुमरेंची भावजय, पीएच्या दारु दुकानांना एका दिवसात मंजूरी! विभागीय आयुक्त, सीईओसह अनेकांना खंडपीठाची नोटीस

मात्र सदरील काम संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. त्यामुळे पाटोदा येथील नागरिक महादेव नागरगोजे तसेच ह.भ.प. रामकृष्ण रंधवे, लक्ष्मणराव जाधव यांनी ॲड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांच्या मार्फतखंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी पैठण-पंढरपूर महामार्गाचे काम 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते.

Bombay High Court bench Aurangabad News
High Court News : विद्यादीप बालगृहातील मुली पळून गेल्याच्या प्रकरणात काय कारवाई केली ? खंडपीठाचा सवाल

परंतू त्यानंतरही मुदतीत काम झालेच नाही, म्हणून पुन्हा अवमान याचिका दाखल केली. प्राथमिक सुनावणीत प्रतिवादी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता एस. एल. गलांडे, मुख्य अभियंता राजीव सिंग यांना खंडपीठाने नोटीस बजावल्या आहेत. पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य ॲड. रविंद्र वानखेडे, ॲड. गौरव शिवाजीराव खांडे यांनी सहकार्य केले. शासनातर्फे ॲड. एस. आर. वाकळे यांनी काम पहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com