CM Eknath Shinde, Abhijit Bhichukale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : अभिजित बिचुकलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 500 रुपयांत घरगुती सिलिंडर द्या...

Abhijit Bichukale कै. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयांत गॅस सिलिंडर योजना’ अशी योजना सुरू करा, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने जनतेला पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी सण व कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवायचे असेल, तर त्यांच्या १७ नोव्हेंबर या पुण्यतिथीनिमित्त पाचशे रुपयांत घरगुती गॅस सिलिंडरची घोषणा करावी, अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले Abhijit Bichukale यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना ऐन दिवाळीत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, छत्तीसगड येथील जनतेला भाजपने ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातही दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर या पुण्यतिथी दिनाच्या पार्श्वभूमीवर ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळण्यासाठी घोषणा करावी. ही घोषणा करताना कै. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयांत गॅस सिलिंडर ही योजना सुरू करावी आणि कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आपले प्रेम दाखवावे, अशी मागणी पत्रातून केली आहे.

बिचुकले यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेने २०१४ पासून भाजपला सत्तेमध्ये येण्यास मतदान केले आहे. आपण शिवसेना पक्ष फोडून कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सत्तेमध्ये आज मुख्यमंत्री आहात. आपणास मुख्यमंत्री करणारा पक्ष भाजपने छत्तीसगड येथील जनतेला ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देत आहे.

असे असेल तर महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला सत्ता दिली असल्याने आपण भाजपच्या माध्यमातून येथील जनतेला ताबडतोब ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करावी. विशेष म्हणजे ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडरच्या योजनेला तुमचे आदर्श ‘कै. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयांत गॅस सिलिंडर योजना’ असे नाव द्यावे. Maharashtra Political News

महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी ही विशेष सूचना करीत आहे. तरी या योजना तत्काळ मान्य करून तशी घोषणा करावी. भाजपकडून जनतेला दिवाळीची भेट द्यावी, असेही बिचुकले यांनी पत्र‍ात म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT