Pune : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना पू्र्णविराम मिळाला आहे. मात्र, अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत आहे. याचवेळी देशापासून ते राज्यापर्यंतच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भाष्य करत नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बिगबॉस फेम अभिजित बिचुकलेंनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीवरुन बोचरी टीका केली आहे.
अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) यांनी पुण्यात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीसह राजकीय परिस्थिती व आगामी निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अभिजित बिचुकले यांनी मात्र मी आता नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 2024 मध्ये माझा पक्ष 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आणि 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार असल्याचा दावाही बिचुकले यांनी केला आहे.
'ही' नवी मागणी..
यावेळी बिचुकले यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भवनाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यासंबंधीचं एक पत्रही नुकतंच बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना दिलं आहे.
पत्नीला पहिली मुख्यमंत्री करणार...
यापूर्वी अभिजीत बिचुकलेनं त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्याने पत्नी अलंकृता बिचुकलेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळी एखादी महिला मुख्यमंत्री झाली तर तिला भारतीय संस्कृतीची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. ती आपली संस्कृती जपणाऱ्या आणि चालवणाऱ्या गृहिणीची गरज आहे. माझी पत्नी अलंकृता बिचुकले ही महाराष्ट्राचे सौंदर्य, संस्कृती आणि प्रतिष्ठा जपणारी आहे असं म्हटलं होतं.
आता पुन्हा एकदा माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना याआधी तसं पत्रही लिहिलं होतं. ती राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री असेल असंही बिचुकले म्हणाले आहे.
२०१९ ला फडणवीस म्हणत होते...
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार(Ajit Pawar) यांच्या २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवरुन निशाणा साधला आहे. बिचुकले म्हणाले,देवेंद्र फडणवीस म्हणत होते, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग मग पहाटे का केलं किसिंग असा सवाल उपस्थित केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.