Sangli News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Drought News : जतचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार? आठ दिवसांत मागणी मान्य करा, अन्यथा थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा

Demand Of Jat Taluka Declared Drought Affected : सांगलीच्या जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला

सरकारनामा ब्यूरो

Sangli News: सांगलीच्या जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जतच्या जनतेने शिंदे-फडणवीस-पवार सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देत येत्या आठ दिवसांत दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

याआधीच दुष्काळी 80 गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याचा इशारा दिला होता. आता आठ दिवसांच्या आत दुष्काळग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामसभेत ठराव करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने येथील पाण्याचा प्रश्न पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणी संघर्ष समितीच्यावतीने दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. जतमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, तरीही पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कोणतेच पावलं उचलत नसल्याने पाणी संघर्ष समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

सरकारने मंजूर केलेल्या विस्तारित म्हैशाळ सिंचन योजनेच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून सीमा भागातील गावांना पाणी देण्याबाबत सरकारने पावलं उचलावे, यासह आदी मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.

पाणी संघर्ष समितीच्यावतीने राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून येत्या आठ दिवसांत राज्य सरकारने याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास राज्य सरकारची कोणत्याही एनओसीची वाट न बघता थेट कर्नाटकमध्ये जाण्याची भूमिका येथील जनतेने पुन्हा जाहीर केली आहे.

आठ दिवसानंतर जत तालुक्यातील 80 गावांमध्ये पदयात्रा काढून गावागावात जागृती करत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कर्नाटकमध्ये जाण्याबाबतचा ठराव करण्यात येईल, त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याचा पाणी संघर्ष समितीच्यावतीने इशारा देण्यात आला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT