MVA Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MVA Exit Poll : लोकसभेत पश्चिम महाराष्ट्राचा महाविकास आघाडीला 'हात'; शरद पवारांना साथ?

Western Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळत असल्याचे सांगण्यात येते. या पाच जागांतील तीन जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर विविध एजन्सींच्या एक्झिट पोलने राजकीय वातावरण तापवले आहे. देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळताना दिसत आहे. तर राज्यात मात्र महायुतीला सेटबॅक बसत असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. पश्चिम महाराष्ट्राने महाविकास आघाडीला 'हात' दिला असून ज्येष्ठ नेते शरद पवारांना साथ कायम असल्याचेही पोलमधून सांगितले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील दहा जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीला तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळत असल्याचे सांगण्यात येते. या पाच जागांतील तीन ठिकाणी शरद पवार Sharad Pawar गटाचे उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर उर्वरीत चार जागांवर महायुतीचे उमेदवारांना संधी असल्याचेही बोलले जाते. आता एक्झिट पोलचे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरणार, हे 4 जूनला स्पष्ट होईल.

पुणे, बारामती, शिरूर, मावळ, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाचा पश्चिम महाराष्ट्रात समावेश होतो. यातील पुण्यात सुरुवातीला भाजपला सहजसोपी वाटणारी लढत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी Ravindra Dhangekar अटतटीची केली. तरीही येथून भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी होतील, असा अंदाज आहे. मावळमधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणेंना ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंनी जोरदार टक्कर दिली. येथून बारणेंची हॅटट्रीक होणार असल्याचे बोलले जाते.

देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीतून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंपुढे अजितदादांच्या Ajit Pawar पत्नी सुनेत्रा पवारांनी तगडे आव्हान होते. येथून सुळेंचा निसटता विजय होईल, असा अंदाज आहे. शिरूरमधून अमोल कोल्हे शरद पवारांची प्रतिष्ठा राखत अजित पवारांचे आव्हान मोडीत काढण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे भाजपच्या उदयनराजे भोसलेंवर वरचढ ठरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सहज विजयी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलचा आहे. येथून भाजपचे राम सातपुतेंना पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूरकर काँग्रेसचे शाहू छत्रपतींना साथ देणार असल्याचा अंदाज आहे. तर शिंदे गटाचे विद्यामान खासदार संजय मंडलिक पराभूत होतील.

सांगलीकरांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी Vishal Patil साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे पोलमधून स्पष्ट होत आहे. येथून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. हातकणंगलेतून ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील सरुडकरांचा विजय होईल, तर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे धैर्यशिल मानेंना धक्का बसण्याचा अंदाज आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT