Nana Patole On Sanjay Raut: 'राऊत काँग्रेसच्या शाळेत शिकलेत, त्यांनी 'शाळा' करु नये'; पटोले पेटले!

Controversy in Mahavikas Aghadi Over Sangli lok sabha seat: सुरुवातीपासून महाविकास आघाडीसाठी वादाचा मुद्दा ठरलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवरुन एक्झिट पोलनंतरही आघाडीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.
Nana Patole, Sanjay Raut
Nana Patole, Sanjay RautSarkarnama

Nana Patole On Sanjay Raut: देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची आकडेवारी दाखवणारे एक्झिट पोलचे (Exit Poll) अंदाज समोर आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चांगलीच टक्कर होणार असल्याचं दिसत आहे.

याच पोलवरुन महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून आघाडीसाठी वादाचा मुद्दा ठरलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवरुन एक्झिट पोलनंतरही आघाडीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली मतदारसंघाची जागा अपक्ष उमेदवारासाठी अनुकूल असल्याच्या पोलच्या निकालावरुन काँग्रेसला लक्ष केलं. "आम्ही राजकारणात गोट्या खेळायला आलेलो नाही", असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. तर त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. 'संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली' अशी कोपरखळी त्यांनी राऊतांना लगावली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक्झिट पोलसंदर्भात राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आम्हाला महाराष्ट्रात काय होते, हे माहिती आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागणार, कोणता अपक्ष जिंकणार हे सुद्धा मला माहिती आहे. मी सांगलीवर बोलेन आणि बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आम्ही येथे गोट्या खेळायला बसलेलो नाही."

तसंच राज्यात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, आम्हाला एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते असून. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं. त्यामुळे जनतेचा कल आम्हाला माहिती आहे. त्यासाठी आम्हाला तपस्या आणि साधनेची गरज आम्हाला नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं.

Nana Patole, Sanjay Raut
Exit Polls Result 2024 : एकनाथ खडसेंना रोखण्याची तावडेंची खेळी यशस्वी ?

राऊत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली

राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, "राजकारणात कोणीच गोट्या खेळायला बसलेलं नाही. मात्र तुम्ही 100 टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 समाजकारण करतो. राऊत ज्या शाळेत शिकलेत ती शाळा काँग्रेसने निर्माण केली आहे. त्यांचा जन्म झाला ते रुग्णालयदेखील काँग्रेसने निर्माण केलं आहे. ते कालच लंडनहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, हे बघितलं पाहिजे." असं म्हणत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. त्यामुळे आता निकालाआधीच आघाडीतील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com