सातारा : ''राज्यात यापुढं कोणत्याही हिंदुकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला शिक्षा मिळणार आहे. काही पोलीस अधिकारी 'महाविकास'च्या धुंदीत आहेत, ते हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. त्यांचा सांगून कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सातारा (satara) जिल्ह्यातील सातारा, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची यादी तयार करू गृहमंत्र्यांकडे पाठविली जाणार आहे. त्यांना जाणीव करून दिली जाईल'', असा इशारा आमदार नितेश राणे यांनी साताऱ्यात दिला.
लव्ह जिहाद विरोधात सरकार म्हणून भूमिका घेऊन या अधिवेशनात कडक कायदा महाराष्ट्रात करण्याची मागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटणला आज हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. यावेळी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राणे म्हणाले, ''अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. तिचे कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. त्यांना ताकत देणे गरजेचे आहे. मोर्चानंतर त्यांच्यात भितीचे वातावरण होते. आम्हाला धमकी दिली जाईल, फिरणे बंद होईल अशी भीती होती. पण, आता राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंना घाबरण्याची गरज नाही. कुठलाही हिंदू भितीच्या वातावरणात असेल तर त्याला ताकत देणे हे हिंदुत्ववादी संघटनांचे काम आहे'', असं ते यावेळी म्हणाले.
''तसेच पोलीस प्रशासनानेही काम केले पाहिजे. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना टार्गेट केले जात आहे. त्यांना अंधारात ठेऊन धर्म बदलला जातो. लवकरच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार आहे. त्यासाठी इतर सर्व राज्यातील कायद्यांचा अभ्यास करुन हा कायदा महाराष्टात लागू केला जाणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात तो विषय मांडला जाईल. पोलीस ठाण्यात वेगळाच अनुभव येतो. कोणत्या कायद्याने शिक्षा द्यावी याबाबत पोलिसांनाच माहीत नाही'', असही ते म्हणाले.
''सातारा जिल्ह्यातील सातारा, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची यादी तयार करून ती यादी गृहमंत्र्यांना दिली जाणार आहे. या अधिकाऱ्यांना त्यांची जाणीव करून दिली जाईल. राज्यात यापुढे कोणत्याही हिंदुकडे वाकड्या नजरेने पाहू नये, त्याला शिक्षा मिळणार आहे. पोलीस अधिकऱ्यांचा तर सांगून कार्यक्रम होणार आहे'', असा इशाराही आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.