Satara : उदयनराजेंच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थ विकासासाठी दिले आठ कोटी

Chhattrapati Shivaji Maharaj पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा सातारकरांबरोबरच प्रत्‍येकाला सातत्‍याने प्रेरणा देत आहे.
eknath shinde, Udayanraje Bhosale
eknath shinde, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्‍या विकासासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे वाढीव निधीची मागणी केली होती. मागणी, पाठपुराव्‍यामुळे पोवईनाका येथील शिवतीर्थ परिसराचा विकास, सुशोभिकरणासाठी एकनाथ शिंदे यांनी आठ कोटींचा निधी दिल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाव्‍दारे दिली आहे.

पत्रकात म्‍हटले आहे कि, साताऱ्यातला छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जाज्वल्य इतिहासाची महान परंपरा आहे. मराठा साम्राज्‍याच्‍या राजधानीतील पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा सातारकरांबरोबरच प्रत्‍येकाला सातत्‍याने प्रेरणा देत आहे. या पुतळा परिसराच्‍या सुशोभिकरणाचे काम आम्ही हाती घेतले होते.

या कामासाठी पहिल्‍यांदा जिल्हा नियोजन समितीमधून ३ कोटींचा निधी मिळाला होता. यातून परिसर विकास आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्‍यात आले होते. यासाठी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे यावेळी सहकार्य लाभले होते. राजधानीच्‍या लौकिकाला साजेसे या परिसराच्‍या सुशोभिकरणाच्‍या कामासाठी जास्‍तीच्‍या निधीची गरज होती.

eknath shinde, Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, "कोश्यारींच्या कारवाईवर मोदी गांर्भीयाने.."

यामुळे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे आम्‍ही सातारा पालिकेने सुशोभिकरणासाठी दिलेल्‍या प्रस्‍तावास मंजूरी देण्‍याबरोबरच तात्‍काळ निधी देण्‍याची मागणी केली होती. यावेळी श्री.शिंदे यांनी या कामास निधी कमी पडू न देण्‍याचे आश्‍‍वासन दिले होते.यानुसार त्‍यांनी आज नगर विकास खात्‍यामधून ८ कोटींचा निधी दिला आहे.

eknath shinde, Udayanraje Bhosale
शशीकांत शिंदे म्हणतात, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय...

या निधीतुन येथील कामांना चालना मिळणार असून शिवछत्रपतींचा पुतळा असणारे प्रेरणास्‍थान सर्वांना येथून अखंडपणे उर्जा मिळेल, असा विश्‍‍वास व्‍यक्‍त करत उदयनराजेंनी एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभुराज देसाई यांचे आभार मानले आहेत.

eknath shinde, Udayanraje Bhosale
सातारा पालिका घरपट्टी आकारणी प्रक्रिया स्‍थगित करा : शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com