Uddhav Thackeray: "आघाडी करून लढायचं की, स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या. आघाडी करून लढणार असाल तर, विधानसभेसारखे मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेऊ नका. ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत, त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या. कोणत्याही परिस्थितीत अहिल्यानगर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा," असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहरातील काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात प्रवेश केला. ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधले. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, सचिव विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून किरण काळे यांना सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात डांबलं. पण ते शरण गेले नाहीत. खासदार संजय राऊत यांना देखील तुरुंगात टाकलं होतं. सातत्याने शिवसेनेवर हे हल्ले होत आहेत. शिवसैनिक याला कदापि डगमगत नाहीत. काळे हे उत्तम संघटन कौशल्य असणारे धाडसी, अभ्यासू आहेत, असे कौतुक ठाकरेंनी काळेंचे केले. ठाकरेंनी काळेंशी निवडणुकीच्या तयारी बाबत सविस्तर चर्चा करत रस्ते घोटाळ्याबाबत माहिती घेतली. खासदार राऊत यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी त्यांना केल्या. निवडणूक रणनीतीबाबत चर्चा झाली.
किरण काळेंनी बलात्काराच्या कथित गुन्ह्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, अहिल्यानगर मनपाचा सुमारे 350 ते 400 कोटींचा घोटाळा पुराव्यांसह बाहेर काढल्यामुळेच माझ्यावर सत्ताधाऱ्यांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की, मी बलात्कार केलेला नाही. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादी आणि माझ्यात कधीच संपर्क झाला नसल्याचा सीडीआर रिपोर्ट सादर केल्यानंतर मला जामीन दिला आहे. भ्रष्टाचार विरोधी आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून षड्यंत्र रचून मला राजकीय आयुष्यातून कायमच उध्वस्त करण्यासाठी डाव रचला गेल्याचा आरोप काळेंनी केला. मी मेहेरबान न्यायालयाचा आदर करतो. दूध का दूध, पानी का पानी होईल. सत्य समोर येईल. मी कोणतीही अग्निपरीक्षा देण्यासाठी तयार असल्याचे काळे म्हणाले.
मुंबईतून बोलताना काळे यांनी दावा केला आहे की, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष गेलेले अनेक नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय केला जाईल, असे सूचक वक्तव्य केले. अनेक चांगले उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आगामी काळात त्यांचे टप्प्याटप्प्याने प्रवेश पार पडतील, असे काळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.