Dilip Sopal-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Death : अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर ZP निवडणुकीबाबत दिलीप सोपलांचा मोठा निर्णय...

Dilip Sopal News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (ता. २८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूमुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. अजितदादांसोबत काम केलेले नेत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेकजण सैरभर झाले आहेत. त्यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यावर अजितदादांच्या अकाली एक्झिटचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत काम केलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी झेडपी, पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यूनंतर आमदार दिलीप सोपल यांनी झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भाने निवेदन सादर केले आहे. त्यात सोपल यांनी म्हटले आहे की, सविनय आवाहन आपल्या बार्शी तालुक्याचे पालक, बार्शी तालुक्यावर प्रचंड लक्ष असणारे, तालुक्याच्या विकासासाठी कायम आग्रही असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या धक्कादायक निधनाने बार्शी तालुक्यासह संपूर्ण महाष्ट्राला जबरदस्त हादरा बसलेला आहे.

निवेदनात दिलीप सोपल (Dilip Sopal) म्हणाले की, त्याच परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्या दोन दिवसांनी पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँगेस पक्ष (शरदचंद्र पवार) व मित्रपक्ष लढवत असलेल्या महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणी उमेदवार यांना याद्वारे विनंती करण्यात येते.

प्रचारात कोणताही वाजत्री, बॅंड, हलगी, फटाके यासारखे प्रकार लावण्यात येऊ नयेत. उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटींवर भर द्यावा. दादांच्या जाण्याने आपण न भरून निघणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवीत आहोत, याचे भान आणि जान ठेवूनच प्रचार करावा, असे आवाहन सोपल यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आमदार दिलीप सोपल यांनी अजितदादांसोबत राज्याच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिळाली होती. मुळात सोपल हे शरद पवार हाच माझा पक्ष असं मानणारे नेते आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जवळकीचे नाते होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT