Barshi Politic's : बार्शीत दिलीप सोपल-राजेंद्र राऊत यांच्यात पुन्हा होणार अटीतटीची लढाई; ‘ही’ निवडणूक ठरणार रंगतदार

Bazar Samiti Election 2025 : बार्शीत विधानसभा निवडणुकीत राऊत आणि सोपल यांच्यात थेट लढाई होते, त्याच पद्धतीने बाजार समितीसाठीही या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुल्यबळ लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Dilip Sopal-Rajendra Raut
Dilip Sopal-Rajendra Raut Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 August : बार्शीत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या पारंपारिक विरोधकांमध्ये पुन्हा एकदा घनघोर लढाई पाहायला मिळणार आहे. कारण, तालुक्यातील प्रत्येक निवडणूक ही विधानसभेप्रमाणे लढवली जाते, त्यामुळे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी या दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा जोरदार सामना होणार, हे निश्चित आहे.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Barshi Bazar Samiti) निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. बाजार समितीसाठीची पाच हजार ४०८ मतदारांचा समावेश असलेली प्रारुप यादी जाहीर झाली आहे. त्यावर आलेल्या हरकतींची सुनावणी होऊन येत्या 9 सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे, त्यानंतर मतदान आणि निकालाची तारीख जाहीर होईल.

दरम्यान, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या गटाचे वर्चस्व होते. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही प्रशासकाच्या माध्यमातून त्यांनी आपले वर्चस्व बाजार समितीवर कायम ठेवले आहे, त्यामुळे निवडणुकीत हे मतदार कोणाला संधी देतात, याकडे बार्शीकरांचे लक्ष असणार आहे.

बार्शी बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात पारंपारिक विरोधक माजी आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल हे पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. बार्शीत विधानसभा निवडणुकीत राऊत आणि सोपल यांच्यात थेट लढाई होत असते, त्याच पद्धतीने आता बाजार समितीसाठीही या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुल्यबळ लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dilip Sopal-Rajendra Raut
Chandrakant Patil : एकनाथ शिंदेंच्या मदतीला अखेर चंद्रकांतदादा पाटील धावले; म्हणाले, त्यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलेलं नाही’

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पुन्हा एकदा बार्शीतून विजय मिळविला आहे. त्यांनी राजेंद्र राऊत यांचा पराभव करत सातव्यांदा विधानसभा गाठली आहे. दुसरीकडे, त्यांचे पारंपारिक विरोधक राजेंद्र राऊत यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, बार्शी तालुक्यात त्यांचीही ताकद कमी नाही. राऊत हे दोन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत, त्यामुळे दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांची बार्शीत कायम अटीतटीची लढाई होत असते.

Dilip Sopal-Rajendra Raut
Manoj Jarange Patil : फडणवीसांवर हल्लाबोल करताना जरांगेंनी केले न्या. शिंदे समितीचे कौतुक; म्हणाले, ‘आम्ही शिंदे समितीवर खूश, पण...’

बार्शीच्या सहकार क्षेत्रात माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आजपर्यंत वर्चस्व राखले लागले होते. मात्र, मागील बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली होती. त्या विजयाच्या माध्यमातून राऊत यांनी प्रथमच सहकार क्षेत्रात प्रवेश केला होता. मागील काळात त्यांनी तो आणखी बळकट केल्याची चर्चा आहे, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com