Patan Maratha Protest sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan Maratha Protest : पाटणला आंदोलक आक्रमक; सर्वपक्षीय नेत्यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Umesh Bambare-Patil

-जालिंदर सत्रे

Patan Maratha Protest : एक मराठा.. लाख मराठा.. , या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय.. अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाने व सकल मराठा समाजाने पाटण येथे साखळी आंदोलनाच्या आठव्या दिवशी पाटण शहरातून सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणी साठी आंदोलन सुरू आसताना हे आंदोलन पाटण येथेही साखळी आंदोलनाच्या आठव्या दिवशी सुरू आहे.

मराठा समाजाचे साखळी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने चालू असून, सरकारने मराठा आरक्षणासाठी समाजाचा अंत पाहू नये, असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला. पाटण येथील आंदोलनात सरकारच्या विरोधात दररोज वेगवेगळे उपक्रम राबवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आठव्या दिवशी मराठा आंदोलकांनी सरकार व राज्यातील सर्वपक्षीय मुख्य नेत्यांची पाटण शहरातून अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. अंत्ययात्रा आंदोलन ठिकाणापासून झेंडा चौक ते लायब्ररी चौक पुन्हा झेंडा चौकात या यात्रेचे विसर्जन करण्यात आले. Maharashtra Political News

या वेळी मराठा बांधवाने सरकार व सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात मोठा आक्रोश करून मराठा आरक्षणाची मागणी केली. या अंत्ययात्रेत मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT