Shivendraraje Bhosale on Jalana Protest : जालना लाठीचार्जची घटना दुर्दैवी; चौकशी झालीच पाहिजे...

Jalana Protest जालना येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यावर भाजपचे सातारा, जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भूमिका मांडली.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Shivendraraje Bhosale on Jalana Protest : जालना येथील लाठीचार्जची घटना दुर्दैवी असून याची चौकशी झालीच पाहिजे. या घटनेमागे जो कोण आहे तसेच पोलिस प्रशासनाचे काही चुकले असेल तर त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिक्षा होईल. आता मराठा समाजाने संयम बाळगला पाहिजे, हिंसक होऊ नये, असे आवाहन भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

अंतरवेली (जालना) येथे मराठा Maratha समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस Police लाठीमाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजपचे सातारा, जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी लाठीचार्जची घटना दुर्दैवी असून याची चौकशी झालीच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, आंदोलन करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हे माध्यम असते. कुठल्याही आंदोलकांवर लाठीचार्ज होणं हे योग्य नाहीच. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि न्यायालयातही टिकले.

पण, फडणवीस यांचा पायउतार झाल्यावर आरक्षण न्यायालयातून गेलं. सध्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होत. पण ठाकरे सरकार आल्यावरच हे आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे.

MLA Shivendraraje Bhosale
Jalna Maratha Protest : जखमी आंदोलकांना भेटण्यासाठी शरद पवार, उदयनराजे, संभाजीराजे जाणार..; धुळे, संभाजीनगरमध्ये एसटी बसची जाळपोळ

जालना येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही दुर्दैवी घटना आहे. याची चौकशी झालीच पाहिजे. कुणाच्या चुका झाल्या असतील त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिक्षा होईल. मराठा बांधवांनी संयम बाळगला पाहिजे. आजपर्यंत लाखोचे जे मोर्चे आपण शांततेच्या मार्गाने काढले.

त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यापुढे ही समाजाने हिंसक होऊ नये, ही विनंती. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी कायम मराठा बांधवांच्या बरोबर आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई आपण जिंकुच आणि आपलं गेलेलं आरक्षण आपल्याला परत मिळेल अशी अपेक्षा आहे. या सगळ्या घटनेच्या मागे कोण असेल अगदी पोलिस प्रशासन चुकलं असेल तरी पण कारवाई झाली पाहिजे.

Edited By Umesh Bambare

MLA Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde on Jalana Protest : लाठीहल्ल्यावरुन शशिकांत शिंदे भडकले; म्हणाले, भाजपचा सत्तेचा माज उतरवला जाईल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com