Crime News : Ahamednagar News : Sangram Jagtap
Crime News : Ahamednagar News : Sangram Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Crime News : नगरमध्ये दिवसाढवळ्या तीन व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार !

सरकारनामा ब्यूरो

Ahamednagar News : अहमदनगर शहरातील महात्मा गांधी रस्ता परिसरातील तीन व्यापाऱ्यांवर काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. दीपक नवलानी (Deepak Navlani) आणि प्राणिल बोगावत या व्यापाऱ्यांवर धारदार शस्त्राने प्राणघातक करण्यात आला आहे. दीपक नवलानी यांच्या पोटावर मोठ्या प्रमाणात वार करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अहमदनगर शहरातील कापडबजार परिसरात दीपक नवलानी व प्राणिल बोगावत या दोन व्यवसायिकांवर हल्ला झाला असून, किरकोळ कारणांने हल्ला झाल्याची घटना घडली आहे .या दोन्ही व्यापाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दीपक नवालनी यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ही घटना कळताच, आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन दीपक नवालनी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. डॉक्टरांशी दीपक नवालनी यांच्या प्रकृती बाबत चर्चा केली. (Latest Marathi News)

ही घटना घडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती तसेच ज्या प्रकरणातील आरोपींना तातडीने पकडावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना व्यापाऱ्यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे स्वतः जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. नागरिकांना त्यांनी शांततेचे आवाहन केल आहे.

हा हल्ला होत असताना प्रत्यक्षदर्शी सांगितले की, पोलीसांकडून हा रस्ता बंद केला गेला होता. त्यावरून व्यापाऱ्यांमध्ये थोडासा ताण निर्माण झाला होता. तो ताण निवळण्यात आला होता. मात्र यानंतर एक जण चाकू घेऊन आला, अचानक हल्ला केला. दीपक नवलानी यांना पूर्ण रक्तबंबाळ केलं. मी हा हल्ला थांबवण्यासाठी गेल्यावर माझ्या ही हाताला दुखापत झाली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. (Crime News)

दरम्यान, या प्रकरणानंतर अहमदनगर शहरात चांगलीच धावपळ उडाली होती. उद्या कापड बाजार बंद असल्याची घोषणा व्यापाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना तोफखाना पोलिसांनी तात्काळ अटक करून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT