Police  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session : पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार ; तनपुरेंच्या लक्षवेधीची फडणवीसांकडून दखल ; बडतर्फ करणार..

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Crime : जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची फिर्याद देणा-या महिलेवरच पोलीस उपनिरिक्षकाने लैगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस खात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सज्जनकुमार यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी या‌प्रकरणी राहूरी पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत हा अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अत्याचाराची घटना घडली असेल तर दोषींना बडतर्फ करण्याच आश्वासन दिले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

राहुरी तालुक्यातील एका ३० वर्षीय महिलेने जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना

सज्जनकुमार नऱ्हेडा यांनी "यात माझा काय फायदा ? पैशा व्यतिरिक्त काय फायदा होईल? असे म्हणत पिडीत महिलेचा मोबाईल नंबर मागितला. पिडीतेला व्हाट्सअपवर मेसेज पाठवून 'तु खुप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर' अशी जबरदस्ती केली. पिडीतेला स्वतःच्या घरी बोलावून सज्जनकुमार याने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पीडीत महिलेने दिली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT