Ganesh Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory: गणेश साखर कारखान्याच्या निकालावर राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लोकशाहीत....

Ganesh Sakhar Karkhana Election Result: सभासदांचा कौल आपण नम्रपणे स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालतच असतात.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Politics : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्याकडून यंदा मात्र सभासदांनी पाठ फिरवत कारखाना पुन्हा कोल्हे गटाच्या ताब्यात दिला. हा निकाल विखे-पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानला जातो. याचं कारण म्हणजे जवळपास दहा वर्ष गणेश कारखान्यातील सत्ता विखे-पाटील यांच्याकडे होती. पण कोल्हे गटाला या विजयासाठी माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची सर्वात मोठी मदत झाली.

गणेश कारखान्याचा धक्कादायक निकाल हा केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरला तो राज्याचे महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांच्च्याया पॅनलच्या दारुण प्रभावामुळे.

एकूण 19 संचालकांपैकी राधाकृष्ण विखे यांच्या पॅनलला केवळ एका ठिकाणी विजय मिळवता आला तर कोल्हे-थोरात पॅनलचे तब्बल 18 उमेदवार निवडून आले आणि त्यांनी एक हाती सत्ता कारखान्यावर मिळवली. (Ganesh Sugar Factory Result)

एकूणच हा पराभव विखे पिता-पुत्रांसाठी मोठा धक्का मानला जात असून जिल्ह्यातील त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावणारा ठरणार का याबद्दल मोठी चर्चा सुरू असतानाच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी या पराभवावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सभासदांचा कौल आपण नम्रपणे स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालतच असतात. त्यांना (कोल्हे थोरात) काम करण्यासाठी शुभेच्छा असं विखे पाटील म्हणाले. (Ahmednagar Politics)

थोरात आणि कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या विजयी सभेमध्ये विखे पिता-पुत्रांची राहाता लोणी परिसरात दहशत आणि हुकुमशाही असल्याचा आरोप करत त्याबद्दल अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडलं. गणेशच्या निमित्ताने जे परिवर्तन झाले ते 2024 साली दिसेल असे अनेकांनी म्हटलं गेलं. यावर राधाकृष्ण विखे यांना छेडला असता ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच बोलायचा अधिकार आहे, आपलं मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य आहे. त्यांना (कोल्हे-थोरात) आनंद घेऊ द्या, मी त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार. मात्र एक आहे की, गणेश कारखाना खाजगी क्षेत्रात विकला गेला असता. ज्यांच्यामुळे तो बंद पडला आता सभासदांनी त्यांनाच पुन्हा चालवायला दिला आहे. आमची जबाबदारी होती की विकला जाणारा कारखाना सुरळीत चालू ठेवणे आणि ती जबाबदारी पार पाडलीआहे त्यातच आम्हाला आनंद आहे असं विखे पाटील म्हणाले.

कारखान्याच्या निकालानंतर 2024 ची विधानसभा निवडणूक समोर ठेवून अनेक वक्तव्य आता होऊ लागले आहेत. विशेष करून माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विजयी सभेमध्ये विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला होता. मात्र स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मात्र सावध भूमिका आपल्या भाषणात घेताना या निवडणुकीला पक्षीय झालर नसल्याचे स्पष्ट करतानाच कारखान्याच्या निवडणुका ह्या वेगळ्या मुद्द्यांवर होतात असं सांगत ही निवडणूक राजकीय अंगापासून दूर ठेवण्याचा सावध पवित्रा घेतला. आता त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी एकूणच पराभवा नंतर झालेल्या टीकेला उत्तर देताना सावध पवित्रा घेतला असून वेट अँड वॉच ची भूमिका विखे परिवारांना घेतल्याचे एकंदरीत दिसत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT