Hasan Mushrif and MLA Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajara Sugar Factory Election: 'आजरा' निवडणुकीत 'बाजीगर' मुश्रीफच ; सतेज पाटलांसह कोरेंना धोबीपछाड

Ajara Sugar Factory: राष्ट्रवादीचा एकहाती विजय, आजरा कारखान्यातही ‘बिद्री’ची पुनरावृत्ती झाली.

Rahul Gadkar

Kolhapur News: आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे असा सामना रंगला होता. मात्र, या निवडणुकीत मुश्रीफांनी सतेज पाटील आणि आमदार विनय कोरेंना धुळ चारली आहे. राष्ट्रवादीचा एकहाती विजय झाला असून आजरा कारखान्यातही ‘बिद्री’ची पुनरावृत्ती झाली.

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऐनवेळी रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनलने संचालकपदाच्या 21 पैकी 19 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या आघाडीला धोबीपछाड दिला. त्यांच्या चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आजरा कारखान्यातही ‘बिद्री’ची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीत कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह नऊ संचालकांना पराभवाचा धक्का बसला. सभासदांनी 12 नवीन चेहऱ्यांना संधी दिली. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अनेक अर्थांनी गाजलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील आदी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सुरुवातील या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोधचा प्रयत्न केला. मात्र, जागा वाटपावरून समझोता झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावामुळे राष्ट्रवादीने श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी हे स्वतंत्र पॅनेल ऐनवेळी उभे केले. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्हीही आघाड्यांमध्ये विद्यमान संचालकांचा भरणा होता. सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची होईल, असं वाटत होतं. पण निकालात राष्ट्रवादीने (NCP) चांगलीच आघाडी घेत बाजी मारली. राष्ट्रवादीचा विजय झाल्यानंतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

राष्ट्रवादीच्या विजयानंतर मुश्रीफ काय म्हणाले ?

"श्री.रवळनाथ देवाने आजरा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती द्यावी, स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या कष्टाने कारखाना उभारला. हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. या भावनेचे पावित्र्य आम्ही जपू. सर्व सभासद आमच्या आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयासाठी कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले", अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

सतेज पाटील काय म्हणाले ?

"कारखाना कर्जमुक्त व्हावा, सभासदांचे हित जोपासले जावे, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह होता. त्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सभासदांचा कौल मान्य आहे. यापुढेही कारखाना व सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील राहू", अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.

(Edited by- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT