उपमुख्यमंत्री अजित पवार

 
सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

अजित दादांनी श्रीगोंद्यातील नेत्यांना दिला सूचक सल्ला

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्हा हा सहकारी साखर कारखान्यांचा जिल्हा समजला जातो. श्रीगोंदे तालुक्यातील नागवडे व कुकडी अशा दोन साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने पुढील रणनीती ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी श्रीगोंद्यातील महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) नेत्यांची मुंबईत काल ( सोमवारी ) रात्री बैठक घेतली. Ajit Dada gave suggestive advice to the leaders of Shrigonda

उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेल्या बैठकीला बाबासाहेब भोस, घनशाम शेलार, राजेंद्र नागवडे, राहूल जगताप, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे उपस्थितीत होते. भाजप नेते, आमदार बबनराव पाचपुते यांनी दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांत ताकत दाखविण्याच्या केलेल्या घोषणेवर चर्चा झाली.

या प्रसंगी अजित पवार म्हणाले, कुणी कुणाला कुठे मदत केली, कुणाचे कुणावर किती उपकार आहेत याची उजळणी करीत बसू नका. कारखानदारी अडचणीत आहे दुसऱ्यांच्या कारखान्यात डोकावण्यापेक्षा ज्याने त्याने आपल्या कारखान्यांच्या निवडणूका पहा. कुणात किती ताकत आहे याचा विचार करुन नका तुमची काय तयारी आहे हे पहा. कारखानदारी चालविणे सोपे राहिलेले नसल्याने निवडणूकांवर फोकस करा, असा सूचक सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंद्यातील नेत्यांना दिला.

दरम्यान बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी सगळ्यांकडून समजून घेतले. यापूर्वी कुणी कसे राजकारण केले, कुणाचे कुणावर किती उपकार आहेत याची बेरीज, बजाबाकी करीत बसू नका, मला सगळे माहिती आहे. दुसऱ्याच्या कारखान्यात काय चालले आहे हे नागवडे व जगताप दोघांनीही पाहत बसू नका. आपआपली निवडणूक सांभाळा असे स्पष्ट सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी नागवडे व मगर यांचा वाद नेमका का झाला, मगर तर बापुंसोबत चाळीस वर्षे राहिले मग एवढे विकोपाला का गेले असे विचारल्यावर बाबासाहेब भोस यांनी त्यांना वादाचे कारण सांगितले. त्यावर पवार यांनी आता सगळे वाद बंद करा व निवडणुकीला सामोरे जा, असे सूचविल्याचे समजले.

दरम्यान केशवराव मगर व अण्णासाहेब शेलार या नागवडे विरोधकांनी सोमवारी दुपारीच उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली होती. तीत कारखान्याची परिस्थिती, त्यांच्या विरोधाची कारणे त्यांना सांगितल्याचे समजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT