Poonam Pandey-Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar on Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू; अजितदादांकडून सभेत उल्लेख अन्‌ उपमुख्यमंत्र्यांवर ओढावली नामुष्की!

Ajit Pawar Solapur Tour : आज खुद्द पूनम पांडे हिने इन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर पूनम पांडे हिने मृत्यूचा स्टंट केल्याचे पुढे आले.

Vijaykumar Dudhale

Solapur News : पूनम पांडे या प्रसिद्ध मॉडेलच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी (ता. २ फेब्रुवारी) सर्वत्र व्हायरल झाली होती. मात्र, तो स्टंट असल्याचे आज पुढे आले होते. खुद्द पूनम पांडे हिनेच आपण जिवंत असून सर्वायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली दिली होती. मात्र, यापासून अनभिज्ञ असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनमच्या मृत्यूचा उल्लेख महिला मेळाव्यात केला. त्यामुळे अजितदादांवर पुन्हा एकदा नामुष्की ओढावली. (Ajit Pawar mentioned death of Poonam Pandey's in the Solapur's Melava)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते किसन जाधव यांनी आज (ता. 3 फेब्रुवारी) महिला मेळावा आणि सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी पूनम पांडे हिच्या मृत्यूचा उल्लेख केला. मात्र, ते या सर्व गोष्टींपासून दूर असल्यानेच ही चूक घडल्याचे स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कधी कोणता आजार होईल. त्याबाबत आपल्याला सांगता येत नाही. आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं की एक कमी वयाची पांडे म्हणून अभिनेत्री होती. परंतु ती असाच एक गंभीर आजार झाला आणि फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. यातून मला एकच सांगायचं आहे की, तुम्ही महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ, महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा काळजी घेईल.

आपल्या सर्वांचा आहार, विहारही चांगला असला पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मिस्त्री लावणे व इतर व्यसनं करू नका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या आहेत. मीही लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यात समाजातील गरिब घटक आणि महिला-मुलींसाठी अधिकचं देण्याची ग्वाही देतो, असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, पूनम पांडे हिच्या मृत्यूच्या अतिरंजित बातम्या काल प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियातून तिच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले होते. मात्र, आज खुद्द पूनम पांडे हिने इन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर पूनम पांडे हिने मृत्यूचा स्टंट केल्याचे पुढे आले.

सर्वायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली पूनम पांडे हिने आपल्या व्हिडिओमधून दिली आहे. पण, राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री हाकणारे अजित पवार या गोष्टीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळेच ते सोलापुरातील सभेत बोलून गेले आणि त्यांच्यावर नामुष्की ओढावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT