Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवारांपेक्षा आम्ही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं..; भाजपसोबतच्या युतीवर अजितदादा म्हणाले,..

Maharashtra Politics : शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भाजपसोबत युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. "भाजपाबरोबर २५ वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. शरद पवारांपेक्षा आम्ही काही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं काही कारण नाही" असे ते म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे.”

"२०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा २५ वर्षांपासून मित्रपक्ष होते. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यभर सभा घेण्यास प्रारंभ केला आहे. येवला, बीडनंतर आता शरद पवारांची कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापुरात २५ तारखेला दसरा चौकात पवार कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

असं कृपा करून समजू नका...

कोल्हापुरातील सभेबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, "“शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्षे आम्ही सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT