Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : ‘लाडकी बहिणी’चा लाभ घेणाऱ्या पुरुषांना अजितदादांनी आपल्या स्टाईलने सुनावले; ‘त्यांना पुरुष म्हणावं की आणखी काही?’

CM Ladki Bahin Yojana News : जिच्या हाती कधी पैसा येत नव्हता. पण, या योजनेमुळे तिलाही वाटायला लागलं की माझाही काही अधिकार आहे. माझ्याकडेही सरकार लक्ष देतंय.

Vijaykumar Dudhale

Kolhapur, 25 August : तपासणी करत असताना पुरुषांनीही लाडकी बहिण योजनेचा फायदा घेतल्याचे दिसून आले. आता त्या पुरुषाला पुरुष म्हणावं की आणखी काही म्हणावं? हे बरं नव्हं राव. लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर ॲक्शन घेतली तर कसं वाटेल? मग गार गार वाटेल ना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या पुरुषांना सुनावले.

कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेबाबत भाष्य केले. ते म्हणाले, महिलांना समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महापलिका आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेत सहभागी करून घेण्याचे काम जे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारामध्ये होते. ते आम्ही केले आहे.

आता पुढच्या 2029 च्या निवडणुकीत आमदारकी आणि खासदारकीमध्येही महिलांना एक तृतीयांश जागा मिळणार आहेत. त्या ठिकाणीही महिलांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत. आम्ही महिलांसाठी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. आता या योजनेतील वेगवेगळे बारकावे पुढे येत आहेत, असेही अजितदादा म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बळीराजा, माझ्या लाडक्या बहिणींकरता, गोरगरिबांच्या मुला-मुलींकरिता, गरीब घटकांसाठी, पंतप्रधान आवास योजना, घरकुल बांधणीचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यात आणला आहे. राज्यात वीस लाख घरे बांधणीचा आपला संकल्प आहे. त्या योजनेच्या अटी व शर्तीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. जे लोक बेघर आहेत, त्यांना घर मिळावे, असा हेतू आहे. गायरान असेल तर त्या ठिकाणी घरकुलासाठी जागा दिली जाणार आहे, या पद्धतीने सरकार काम करत आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सर्व्हे सुरू आहे. त्या सर्व्हेमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचीही नावे असल्याचे दिसून आले आहे. मागेही तपासणी करताना काही पुरुषांनीही लाडक्या बहिणींचा लाभ घेतल्याचे दिसून आले. आपण लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आहे आणि तू कशाला मध्येच काहीतरी करतोय. त्यांच्यावर अक्शन घेतली मग कसं वाटेल. ज्यांच्यासाठी ही योजना आणली आहे, त्या घटकानेच ज्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. ज्यात आम्ही जात पात पाहिली नाही, असेही अजितदादांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे, ती माझी बहीण लाडकी योजनेसाठी पात्र ठरली आहे. सुमारे 65 वर्ष वयोमर्यादेपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी जवळपास 45 हजार कोटी रुपयांची तरतूद आम्हाला करावी लागते. जिच्या हाती कधी पैसा येत नव्हता. पण, या योजनेमुळे तिलाही वाटायला लागलं की माझाही काही अधिकार आहे. माझ्याकडेही सरकार लक्ष देतंय. या योजनेमुळे काही महिलांनी घरगुती उद्योग सुरू केले आहेत. याच लाडक्या बहिणींसाठी अशा काही योजना आणण्याचा आमचा मानस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT