Yugendra Pawar : युगेंद्र पवारांचा मोठा निर्णय; ‘इथून पुढे अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही’

Baramati Political News : शेवटी हे कुटुंब आहे, सगळ्यांनी मोठ्या कष्टातून हे उभे केलेले आहे. त्यामुळे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. पण मी माझं काम करत राहीन, लोकांमध्ये जात राहीन.
Yugendra Pawar-Ajit Pawar
Yugendra Pawar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 25 August : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. कारण बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनीच आव्हान दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी ताकद लावली होती. दोन्ही बाजूंकडून अटीतटीचा प्रचार, आरोप-प्रत्यारोप झाले होते. पण, आता युगेंद्र पवार यांनी मोठा निर्णय घेतला असून ‘इथून पुढे अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही’ असे त्यांनी जाहीर केले आहे.

युगेंद्र पवार (Yugendra Pawar) म्हणाले, मला बारामतीशिवाय दुसरीकडे बाहेर कुठे करमणार नाही. बारामती हे माझे गाव आणि घर आहे. त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि इथून पुढेही मी बारामतीत काम करत राहीन. पण, इथून पुढे मी अजितदादांच्या विरोधात उभं राहणार नाही.

राजकारणात काहीही घडू शकतं. शरद पवार हे राज्यसभेवर गेले, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली. अजितदादाही (Ajit Pawar) उद्या एखाद्या वेळी दुसरा निर्णय घेऊ शकतील. दुसरीकडून.... (युगेंद्र पवार यांनी हे वाक्य अर्धवट उच्चारले). पण, मला अजितदादांबाबत काही बोलायचे नाही, असे सांगून युगेंद्र पवार यांनी त्याबाबत अधिक बोलणं टाळले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या कुटुंबात जे काही झालं, ते मला वैयक्तिक अजिबात आवडलं नव्हतं. आताही मला ते आवडत नाही. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटी हे कुटुंब आहे, सगळ्यांनी मोठ्या कष्टातून हे उभे केलेले आहे. त्यामुळे आता कुठंतरी थांबलं पाहिजे. पण मी माझं काम करत राहीन, लोकांमध्ये जात राहीन. जेव्हा लोक मला लायक समजतील, तेव्हा शंभर टक्के लोक मला तिथून निवडून देतील, असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी बोलून दाखवला.

Yugendra Pawar-Ajit Pawar
Shivsena UBT : सोलापुरात ठाकरे सेनेकडून अनोख्या पद्धतीने वराह जयंती साजरी; ‘राणे अन्‌ त्यांच्या दोन पिल्लांना उकिरड्यात लोळण्याची सवय’

पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना उतरवून चूक झाली होती. ते टाळायला हवे होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी म्हटलं होतं. ते मला आता समजतंय की, ते बरोबर आहे.

Yugendra Pawar-Ajit Pawar
Mahayuti's Minister Dispute : राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटलांचा जयकुमार गोरेंना टोला; ‘मी काय दोन-तीन हजारांनी निवडून येत नाही’

आमच्या दोघांकडूनही चूक झाली, असे मला वाटते. हे मी पहिल्यांदाच सांगतोय. पण दोघांकडूनही चूक झाली आहे आणि ती चूक दोघांनीही सुधारली पाहिजे, अशी भावना आणि इच्छा व्यक्त करतो, असेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com