Ajit Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Bank On Ajit Pawar; अहमदनगर जिल्हा बँकेत काय घडले? अजितदादा म्हणाले, दिवसा आमच्याकडे अन् रात्री तिकडे

Ahmednagar District Bank Election on Ajit Pawar : अहमदनगर जिल्हा बॅंकेतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar District Bank Election News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला, यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बँकेच्या संचालकांना इशारा दिला.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यक्रमासाठी अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बँकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, एक गोष्ट अलिकडच्या काळात फार चुकीची घडली आहे. अहमदनगर जिल्हा बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक, त्यामध्ये काय घडले? कसे घडले? सगळे मला माहिती आहे. दिवसा इकडे आणि रात्री तिकडे, असे चालणार नाही, असे पवार म्हणाले.

''अरे जनाची नाही तरी मनाती ठेवायची, तिथे १४ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले यांचा पराभव होतो. असली माणसं नकोत आम्हाला, यांचे काय करायचे. अशी माणसं आम्हला नको, आम्ही गरिबांकडे जाऊन हात जोडू ती गरीब माणसं विश्वासाने आपल्या बरोबर राहतील, गरीब शब्दाला पक्की असतात, पण पद दिलेली मात्र, चुकीची वागतात,'' असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक दिवस अगोदर बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी आवश्यक सूचना दिल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेही या बैठकीला उपस्थित होते. त्याच बरोबर महाविकास आघाडीचे सर्व संचालक उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत घुले यांचा पराभव झाला. त्यावरुन अजित पवार म्हणाले, दिवसा आमच्या सोबत आणि रात्री तिकडे, असे चालणार नाही.

दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक भाजपकडे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. या निवडणुकीत आघाडीची चार मते फुटली होती. त्यावरुन अजित पवार यांनी या संचालकांना इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT