Shambhuraj Desai, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : अजित पवारच सरकार चालवत होते...शंभूराज देसाईंचा आरोप

पाटण Patan विधानसभा मतदासंघातील जनतेने कारखाना कार्यस्थळावर Sugarfactory area जंगी स्वागत Welcom केले. त्यानंतर त्यांनी लोकांशी संवाद साधला.

अरूण गुरव

मोरगिरी : मी सुचवललेल्या जिल्हा नियोजन आणि अर्थसंकल्पातील विकास कामांच्या यादीत माझ्या विरूद्ध लढणारे उमेदवार, राष्ट्रवादीचे खासदार यांची पत्रे होती. त्यामुळे ते संबंधित कामांचे भूमीपूजन करुन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही कामे मंजूर केल्याचे सांगत होते. या संदर्भात पालकमंत्र्याशी मी दहा वेळा बोललो. परंतू त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच सरकार चालवत होते, असा आरोप माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर शंभूराज देसाई हे दौलतनगर येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांचे पाटण विधानसभा मतदासंघातील जनतेने कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी लोकांशी संवाद साधला.

श्री. देसाई म्हणाले, सुरूवातीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना, भाजप पक्षाला राज्यातील जनतेने स्पष्ट कौल दिला होता. त्यामध्ये मी निवडून आलो. त्यावेळी सरकार बनवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाबरोबर जाण्यासाठी काही आमदारांचा विरोध होता. एका बाजूला राष्ट्रवादीबरोबर लढायचे आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीमंडळात राहायचे आम्हाला योग्य वाटले नाही. हा घरोबा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परवडणारा नव्हता.

त्यामुळे आमच्याबरोबर असलेल्या आमदारांनी केलेली ही गद्दारी किंवा बंड नसून तो शिवसेना पक्षांतर्गत उठाव आहे. कुणीही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्ही पक्षातच राहणार आहे. (कै) बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादाचे ज्वलंत विचार घेवून पुढे जाणार आहोत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येतील. त्याचबरोबर पाटण विधानसभा हा मतदासंघ विकास कामांमध्ये जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT