Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan : सर्व विकास कामांचे श्रेय रामराजेंना; मला श्रेयवादात पडायचे नाही : निंबाळकर

Ranjitsinh Naik Nimbalkar सोळशी प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम-बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील.

Umesh Bambare-Patil

Ranjitsinh Naik Nimbalkar News : मी ज्या वेगाने विकासकामे करीत आहे त्याचा आमदार रामराजेंना जोराचा धक्का बसला आहे. त्यातून ते सावरावेत यासाठी आपण नीरा-देवघर, रेल्वेसह अन्य सर्व आणलेल्या सर्व विकास कामांचे श्रेय रामराजे Ramraje Naik Nimbalkar यांना देत आहे. मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत. त्यामुळे श्रेयवादात पडायचे नाही, असा टोला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदारांना घटनेतील ३७२ कलम रद्द करता येईल का अशी टीका आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यावर बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, जो कर्तृत्ववान असतो तो तांत्रिक मुद्दे वाढवीत नाही.

मी ज्या वेगाने विकासकामे करीत आहे, त्याचा आमदार रामराजे यांना जोराचा धक्का बसला आहे. त्यातून ते सावरावेत. यासाठी आपण नीरा-देवघर, रेल्वेसह अन्य सर्व आणलेल्या सर्व विकास कामांचे श्रेय रामराजे यांना देत आहे. मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत. त्यामुळे श्रेयवादात पडायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोळशी प्रकल्पाबाबत ते म्हणाले, हा प्रकल्प महाबळेश्वरच्या पायथ्याशी देवसरे गावजवळ सोळशी नदीवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत सोळशी नदीवर संधानकातील धरण प्रस्तावित आहे. या धरणामध्ये अडविण्यात येणारे पाणी हे बोगदा काढून त्याव्दारे वाई तालुक्यातील धोम जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे.

दुष्काळी जनतेच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या नीरा-देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे आगामी काळासाठी आणखीन काय हवेय का, अशी विचारणा केली होती. तद्‌नंतर पाणीप्रश्नी अधिक अभ्यास करुन आपण त्यांच्याकडे सोळशी प्रकल्पाची मागणी केली आहे. या प्रकल्पाचा अभ्यास जलतज्ञांनी केला आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम-बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT