MLA Radhakrishn Vikhe Patil
MLA Radhakrishn Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सर्व निवडणुका भाजपमार्फतच लढणार : विखे पाटलांची घोषणा

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यासाठी निमित्त होते, श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भाजपतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याचे. All elections will be fought through BJP: Vikhe Patil's announcement

या मेळाव्याला माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, सुनील वाणी, शरद नवले, उपसभापती नितीन भागडे, बाळासाहेब तोरणे, नानासाहेब शिंदे, भाजपचे बबन मुठे, मारुती बिंगले, केतन खोरे, गणेश राठी, भीमा बागुल, संगीता गांगुर्डे, सुप्रिया धुमाळ, मुक्‍तार शेख यांच्‍यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात तालुक्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्‍यक्‍त करण्यात आला. या प्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आतापासुन तयारी सुरू करावी. त्यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्याची घोषणा करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी नागरिकांशी संपर्क करण्याचे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विखे पाटील पुढे म्हणाले, कोरोनासह नैसर्गिक आपत्‍तीमुळे सध्या राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न आणखी गंभीर बनले आहेत. राज्य सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यात कुठलाही रस वाटत नाही. जनतेचा उद्रेक रोखण्यासाठी सरकार केवळ जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्‍न सोडविण्‍यास महत्‍व देण्‍यापेक्षा जमावबंदीचा आदेश लागू करण्‍यावर सरकारचा भर असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्‍यभरातील एसटी कामगारांचा संघर्ष सुरू आहे. मागील दोन वर्षांत सरकारने जनतेला कुठलीही भरीव मदत केली नाही. आता विजेच्या प्रश्नासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गावोगावी रस्त्यांवर उतरून वसुली सरकारला जाब विचारण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी त्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात सरकारला योग्यता वाटते. सत्ताधारी नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या केवळ बैठका सुरू आहेत. कामगारांना न्याय देण्याची इच्छाशक्ती राज्यातील सरकारमध्ये नसल्याचे ते म्हणाले.

त्या मुद्द्यांशी जनतेला काहीही देणेघेणे नाही

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल वरील कर माफ करून जनतेला मोठा दिलासा दिला. परंतु राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. त्यांना केवळ दारू वरील कर कमी करणे योग्य वाटते. कोरोनानंतर शहरासह ग्रामीण भागात अनेक प्रश्न निर्माण झाले. असुन राज्य सरकार मंत्री नबाब मलिक यांना पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील जनतेला कुणी गांजा पिला, कुणी ड्रग्ज घेतला याच्याशी काहीही देणेघेणे नसून नागरिकांना त्‍यांच्‍या दैनंदिन गरजा अधिक महत्‍वाच्‍या आहेत. राज्य सरकार नागरिकांना मूळ प्रश्‍नापासून लक्ष विचलित करण्‍यासाठी नको, त्या प्रकरणाला अधिक महत्‍व दिल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT